Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रकाश कामगारांचा एक दिवसासाठी अन्नत्याग; पोलिसासह आरोग्य अधिकार्‍यांच्या बेकायदेशीर कारवाई विरोधात उपोषण

इस्लामपूर / प्रतिनिधी : प्रकाश हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर उरूण-इस्लामपूर येथे प्रकाश शिक्षण कामगार युनियनच्या उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी सर्व का

रविवारी सज्जनगड येथे दासनवमी महोत्सव
राजुरीच्या पोलीस पाटलाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
सांगली भाजप जिल्हाध्यक्ष पदाची माळ निशिकांत पाटील यांच्या गळ्यात पडणार?

इस्लामपूर / प्रतिनिधी : प्रकाश हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर उरूण-इस्लामपूर येथे प्रकाश शिक्षण कामगार युनियनच्या उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी सर्व कामगारांनी एक दिवसासाठी अन्नत्याग करून पोलिस व आरोग्य अधिकार्‍यांच्या बेकायदेशीर कारवाई विरोधात उपोषण केले.
प्रकाश हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये कोरोना संकट काळात केलेल्या सेवेबद्दल रुग्णांच्या नातेवाईकांनी दाखल केलेले खोटे गुन्हे पोलिस प्रशासनाने मागे घ्यावेत. म्हणून प्रकाश हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर मधील सर्व डॉक्टर, नर्सिग स्टाफ व इतर सर्व स्टाफ यांनी लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे. गेल्या तीन दिवसापासून प्रकाश शिक्षण कामगार युनियनच्या वतीने हे उपोषण सुरु आहे. आज सर्व कामगारांनी सकाळी नऊ वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात केली. आज अन्नत्याग करुन या कामगारांनी पोलिस व आरोग्य अधिकारी यांच्या बेकायदेशीर कारवाईचा निषेध नोंदविला.
पोलिस प्रशासन राजकीय दबावाखाली असून राजकीय सुडबुध्दीने ही कारवाई सुरु असल्याचे अनेक कामगारांनी आपले मत नोंदवत, पोलिस प्रशासन हे राजकीय व्यवस्थेच्या प्रचंड दबावाखाली आहे. शिक्षण व आरोग्यसारख्या पवित्र क्षेत्रात आम्ही अत्यंत स्वच्छ व प्रामाणिकपणे काम केले आहे व आज ही करत आहे. मात्र, तक्रारीमधील सत्यता न तपासता गुन्हे दाखल करुन घेणे. तपासकाम करताना कामगारांच्यावर दबाव आणणे याच बरोबर उपचार घेतलेल्या रुग्ण व नातेवाईक यांच्यावर ही तक्रार द्या म्हणून दबाव आणणे, असे बेकायदेशीर काम राजकीय दबावापोटी पोलिस अधिकारी करत आहेत. हे अत्यंत दुर्देवी आहे. आम्ही पोलिसांना तपास कामात वेळोवेळी सहकार्य केले आहे. मात्र, पोलिस अधिकार्‍यांची सहकार्याची भुमीका नाही, डॉक्टर व इतर स्टाफलाही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलवुन दबाव टाकला जात आहे. यामुळे सर्व कर्मच्यार्यांत भिती चे वातारवण निर्माण झाले आहे. यामुळे आता आमचा पोलिस अधिकारी यांचेवर विश्‍वास राहीला नसून आमचा न्याय देवतेवर विश्‍वास आहे व आम्हांला योग्य न्याय मिळेल, असा विश्‍वास आज अनेक कामगारांनी उपोषणस्थळी आपल्या मनोगतात व्यक्त केला.
यावेळी प्रकाश शिक्षण कामगार युनियनचे सचिव कुलदीप खांबे, उपाध्यक्ष सुजीत पाटील, खजीनदार हिम्मत जाफळे, रणजीत पाटील, रणधीर फार्णे, रोहण जाधव, विश्‍वजीत पाटील, दिपक सराफदार, सुदर्शन जाधव, सागर जाधव, राहुल पाटील, स्वप्नील पाटील, संग्राम पाटील, निखिल पाटील, निखील मंण्डपाळकर, सुशांत पाटील आदिसह अन्य पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
आज आत्मकेल्श उपोषण
प्रकाश शिक्षण कामगार युनियनच्या कामगारांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत व न्याय मिळावा. यासाठी सुरु असलेल्या उपोषणाचा उद्या चौथा दिवस आहे. पोलीस व आरोग्य अधिकारी यांची सुरु असलेली बेकायदेशीर कारवाई थांबवून दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत. म्हणून उद्या आत्मकेल्श आंदोलन युनियनचे कामगार करणार आहे.

COMMENTS