अकोले : आण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबई यांच्या वतीने मातंग समाजातील विद्यार्थी व पालकांसाठी एकदिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन रविवार (दि. १७ मे) रोजी सकाळी ९.३० वाजता लोणी (ता. राहाता) येथील सुरभी मंगल कार्यालयात करण्यात आले आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. बी. आर. पवार व लहाणू खरात यांनी दिली. या शिबिरात आर्टी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे, निबंधक श्रीमती इंदिरा आस्वार तसेच अधिकारी वर्ग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, मोफत प्रशिक्षण आणि प्रशिक्षण कालावधीत मिळणाऱ्या विद्यावेतनाबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. शिबिरात नागरी सेवा परीक्षा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, अराजपत्रित गट ‘ब’ व ‘क’ सेवा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, तसेच जेईई, नीट, न्यायिक सेवा, बँक, रेल्वे, एलआयसी, नाबार्ड, पोलीस व आर्मी भरती, कर्मचारी निवड आयोग आदी विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपलब्ध पूर्वतयारी प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा व राहुरी या तालुक्यातील दहावी व त्यापुढील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी या शिबिरास उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी संजय शिंदे, लहाणू खरात, भागाजी जाधव, संजय भोंडवे, शिवाजी वायदंडे, प्रा. रघुनाथ खरात, प्रा. डॉ. भाऊसाहेब पवार, प्रा. डॉ. साहेबराव गायकवाड, दिपक जाधव, ऍड. विक्रम गायकवाड, विश्वनाथ आल्हाट, प्रा. डॉ. सुदाम शिंदे, संभाजी पवार, प्रा. डॉ. भाऊसाहेब रणपिसे, गुलाबराव भडकवाड, प्रा. डॉ. अंकुश सूर्यवंशी, प्रा. डॉ. रोहित भडकवाड, बाळासाहेब बोरुडे, शशिकांत शेलार, प्रकाश जगधने व रविंद्र कांबळे आदींनी सहकार्य केले आहे.
अकोले : आण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबई यांच्या वतीने मातंग समाजातील विद्यार्थी व पालकांसाठी एकदिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन रविवार (दि. १७ मे) रोजी सकाळी ९.३० वाजता लोणी (ता. राहाता) येथील सुरभी मंगल कार्यालयात करण्यात आले आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. बी. आर. पवार व लहाणू खरात यांनी दिली.
या शिबिरात आर्टी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे, निबंधक श्रीमती इंदिरा आस्वार तसेच अधिकारी वर्ग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, मोफत प्रशिक्षण आणि प्रशिक्षण कालावधीत मिळणाऱ्या विद्यावेतनाबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
शिबिरात नागरी सेवा परीक्षा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, अराजपत्रित गट ‘ब’ व ‘क’ सेवा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, तसेच जेईई, नीट, न्यायिक सेवा, बँक, रेल्वे, एलआयसी, नाबार्ड, पोलीस व आर्मी भरती, कर्मचारी निवड आयोग आदी विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपलब्ध पूर्वतयारी प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा व राहुरी या तालुक्यातील दहावी व त्यापुढील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी या शिबिरास उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी संजय शिंदे, लहाणू खरात, भागाजी जाधव, संजय भोंडवे, शिवाजी वायदंडे, प्रा. रघुनाथ खरात, प्रा. डॉ. भाऊसाहेब पवार, प्रा. डॉ. साहेबराव गायकवाड, दिपक जाधव, ऍड. विक्रम गायकवाड, विश्वनाथ आल्हाट, प्रा. डॉ. सुदाम शिंदे, संभाजी पवार, प्रा. डॉ. भाऊसाहेब रणपिसे, गुलाबराव भडकवाड, प्रा. डॉ. अंकुश सूर्यवंशी, प्रा. डॉ. रोहित भडकवाड, बाळासाहेब बोरुडे, शशिकांत शेलार, प्रकाश जगधने व रविंद्र कांबळे आदींनी सहकार्य केले आहे.

COMMENTS