कोपरगाव : संजीवनी आयुर्वेदा काॅलेज अँड रिसर्च सेंटरच्या प्रीती अनिल शेजवळ यांनी ‘सोलो वेस्टर्न व्होकल’ या गायन प्रकारात महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स आयोजित ‘युथ फेस्ट २०२६’ अंतर्गत ‘स्पंदन २०२६’ या राज्यस्तरीय संगीत महोत्सवात प्रथम क्रमांक मिळवला. तर याच स्पर्धेत श्रुती नामदेव पठारे हीने ‘सोलो लाईट इंडियन व्होकल’ या गायन प्रकारात तृतिय क्रमांकावर आपली मोहर उमटवली. ‘स्पंदन २०२६’ या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातून ३० पेक्षा अधिक आयुर्वेदा महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धा सिन्नर येथे पार पडल्या. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विध्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्व पैलू विकसित करण्यासाठी संजीवनी आयुर्वेदा महाविद्यालयात सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात. अभ्यासक्रमासोबतच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही विध्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. याच प्रयत्नांचा परिणाम म्हणून महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी विविध स्तरांवरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत असून संस्थेचे नाव उंचावत आहेत.वैद्यकिय शिक्षणातुन सक्षम डाॅक्टर झाडविण्याबरोबरच विद्यार्थी उत्तम नागरीक घडावेत यासाठी संजीवनी नेहमी कटीबध्द असते. संजीवनीचे अध्यक्ष नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थीनींचे अभिनंदन केले तसेच प्राचार्य डाॅ. रामेश्वर पवार, नाॅन अकॅडमिक संचालक डी. एन. सांगळे, संगीत शिक्षक शुभम जाधव व महेश गुरव आणि समन्वयक डाॅ. साईबन मसने व डाॅ. यितल अष्टेकर यांचेही अभिनंदन केले.

कोपरगाव : संजीवनी आयुर्वेदा काॅलेज अँड रिसर्च सेंटरच्या प्रीती अनिल शेजवळ यांनी ‘सोलो वेस्टर्न व्होकल’ या गायन प्रकारात महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स आयोजित ‘युथ फेस्ट २०२६’ अंतर्गत ‘स्पंदन २०२६’ या राज्यस्तरीय संगीत महोत्सवात प्रथम क्रमांक मिळवला. तर याच स्पर्धेत श्रुती नामदेव पठारे हीने ‘सोलो लाईट इंडियन व्होकल’ या गायन प्रकारात तृतिय क्रमांकावर आपली मोहर उमटवली.
‘स्पंदन २०२६’ या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातून ३० पेक्षा अधिक आयुर्वेदा महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धा सिन्नर येथे पार पडल्या.
शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विध्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्व पैलू विकसित करण्यासाठी संजीवनी आयुर्वेदा महाविद्यालयात सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात. अभ्यासक्रमासोबतच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही विध्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. याच प्रयत्नांचा परिणाम म्हणून महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी विविध स्तरांवरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत असून संस्थेचे नाव उंचावत आहेत.वैद्यकिय शिक्षणातुन सक्षम डाॅक्टर झाडविण्याबरोबरच विद्यार्थी उत्तम नागरीक घडावेत यासाठी संजीवनी नेहमी कटीबध्द असते.
संजीवनीचे अध्यक्ष नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थीनींचे अभिनंदन केले तसेच प्राचार्य डाॅ. रामेश्वर पवार, नाॅन अकॅडमिक संचालक डी. एन. सांगळे, संगीत शिक्षक शुभम जाधव व महेश गुरव आणि समन्वयक डाॅ. साईबन मसने व डाॅ. यितल अष्टेकर यांचेही अभिनंदन केले.

COMMENTS