Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रा. भुजबळ ‘रयत’शी बांधिलकी जपणारे आदर्श शिक्षक : भोस

श्रीगोंदा : येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या ज्युनिअर विभागातील इतिहास विषयाचे प्राध्यापक प्रा. रमेश भुजबळ यांचा सेवापूर्ती कृतज्ञत

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा नव्या जलक्रांतीची दिशा; आ. आशुतोष काळे; कुंभारी येथे गोदावरीचे जलपूजन
गोंधळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष धुमाळ यांनी आमदार संग्राम जगताप यांना दिले निवेदन
महिलेच्या धाडसाने चोरीचा प्रयत्न फसला; चोर रंगेहाथ ताब्यात; जामखेडमधील घटना

श्रीगोंदा : येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या ज्युनिअर विभागातील इतिहास विषयाचे प्राध्यापक प्रा. रमेश भुजबळ यांचा सेवापूर्ती कृतज्ञता समारंभ उत्साहात संपन्न झाला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बाबासाहेब भोस होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी प्रा. भुजबळ यांनी संस्थेसाठी केलेल्या उल्लेखनीय सेवांचा गौरव करत, “रयत शिक्षण संस्थेची बांधिलकी जपणारे ते आदर्श शिक्षक आहेत,” असे प्रतिपादन केले.

या प्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात प्रा. भुजबळ यांच्या समर्पित वृत्तीचा उल्लेख करत, “ते विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी शिक्षक असून त्यांनी निष्ठेने सेवा बजावली,” असे गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे यांनी केले. त्यांनी प्रा. भुजबळ यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव प्राचार्य डॉ. के. एच. शिंदे, प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील, उत्तमराव आवारी, उत्तर विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, मिलिंद दरेकर, प्रा. विनोद सासवडकर, अजिंक्य भुजबळ यांसह अनेक मान्यवरांनी मनोगते व्यक्त करून प्रा. भुजबळ यांना शुभेच्छा दिल्या.

समारंभात प्रा. रमेश भुजबळ व त्यांच्या पत्नी  सीमा भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या आई-वडिलांचाही विशेष सन्मान करण्यात आला. सत्कारमूर्ती प्रा. भुजबळ यांनी आपल्या मनोगतातून जीवनप्रवास आणि जडणघडणीचा भावनिक आढावा मांडला.

या कार्यक्रमास महावीर पटवा, प्राचार्य शहाजी मखरे, प्राचार्य राजपुरे, नगरसेवक राजेंद्र खेडकर, प्राचार्य दिलीप भुजबळ, प्राचार्य डॉ. ज्ञानदेव भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संजय फटे यांनी, तर आभार प्रा. रत्नाकर झिटे यांनी मानले.

COMMENTS