Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘एनएमएमएस’मध्ये नागेश विद्यालयाच्या ११ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

जामखेड : रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय, जामखेडने राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत विद्यालयाचे तब्बल ११ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून, विद्यालयाने आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.  श्री नागेश विद्यालयातील बोधले आयुष अविनाश (१४९ गुण), खैरे संचित संतोष (१४९ गुण), भोंडवे यश महादेव (१४७ गुण), वराट यशराज शहादेव (१४५ गुण), भवर यश शंकर (१४४ गुण), माळी कृष्णा नानासाहेब (१२९ गुण), वटाणे ओंकार सुभाष (१२९ गुण), पवार अथर्व हर्षल कुमार (१२८ गुण), धुमाळ सोहम किशोर (१२८ गुण), सानप सार्थक संदीप (११९ गुण), भोसले समर्थ शंकर (९१ गुण) अशा एकुण ११ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.   वरील शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या या विद्यार्थ्यांना पुढील चार वर्षांत प्रत्येकी  ४८००० रुपये, असे एकूण ५,२८,००० रुपयांचे अर्थसाहाय्य मिळणार आहे. या यशामागे विद्यालयाचे मुख्याध्यापक मडके बी.के., पर्यवेक्षक जाधवर सर, गुरुकुल प्रमुख आणि शिष्यवृत्ती विभाग प्रमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विशेषतः  लटपटे डी.व्ही. (सामाजिक शास्त्रे),  चौधरे ए.बी. (गणित), पठाण ए.एन. (सामान्य विज्ञान),  देशमुख एस.एस. (बुद्धिमत्ता चाचणी), पवार एस.एस. आणि  ससाणे एस.आर. या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची कसून तयारी करून घेतली होती. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आमदार रोहित पवार, राजेंद्र कोठारी,  हरिभाऊ बेलेकर, विनायक राऊत आणि स्थानिक स्कूल कमिटीच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. नागेश विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

आई ही प्रत्येक मुलाच्या आयुष्यातील पहिला गुरु : ऍड. देशपांडे ; ‘स्वाभिमानी माऊली’ पुरस्कारांनी आठ आदर्श मातांचा गौरव
महात्मा बसवेश्‍वर यांची ’अक्षय’ विचारधारा सर्वात प्रभावी : डॉ. उपाध्ये
स्नेहल लवांडेचे दहावी परीक्षेत यश

जामखेड : रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय, जामखेडने राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत विद्यालयाचे तब्बल ११ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून, विद्यालयाने आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.

 श्री नागेश विद्यालयातील बोधले आयुष अविनाश (१४९ गुण), खैरे संचित संतोष (१४९ गुण), भोंडवे यश महादेव (१४७ गुण), वराट यशराज शहादेव (१४५ गुण), भवर यश शंकर (१४४ गुण), माळी कृष्णा नानासाहेब (१२९ गुण), वटाणे ओंकार सुभाष (१२९ गुण), पवार अथर्व हर्षल कुमार (१२८ गुण), धुमाळ सोहम किशोर (१२८ गुण), सानप सार्थक संदीप (११९ गुण), भोसले समर्थ शंकर (९१ गुण) अशा एकुण ११ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

  वरील शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या या विद्यार्थ्यांना पुढील चार वर्षांत प्रत्येकी  ४८००० रुपये, असे एकूण ५,२८,००० रुपयांचे अर्थसाहाय्य मिळणार आहे. या यशामागे विद्यालयाचे मुख्याध्यापक मडके बी.के., पर्यवेक्षक जाधवर सर, गुरुकुल प्रमुख आणि शिष्यवृत्ती विभाग प्रमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विशेषतः  लटपटे डी.व्ही. (सामाजिक शास्त्रे),  चौधरे ए.बी. (गणित), पठाण ए.एन. (सामान्य विज्ञान),  देशमुख एस.एस. (बुद्धिमत्ता चाचणी), पवार एस.एस. आणि  ससाणे एस.आर. या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची कसून तयारी करून घेतली होती.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आमदार रोहित पवार, राजेंद्र कोठारी,  हरिभाऊ बेलेकर, विनायक राऊत आणि स्थानिक स्कूल कमिटीच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. नागेश विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

COMMENTS