Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरमध्ये जोडे मारो आंदोलन; बागेश्वर व संजय गायकवाड यांचा निषेध

संगमनेर : संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या तथाकथित भोंदूबाबा बागेश्वर व शिंदे सेनेचा आमदार संजय गायकवाड यांचा तीव्र निषेध करत संगमनेर मध्ये हजारो नागरिकांनी एकत्र येऊन त्यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले. संगमनेर मधील सर्व पुरोगामी संघटना व मी संगमनेरकर यांच्या वतीने बागेश्वर उर्फ धीरेंद्र शास्त्री व शिंदे सेनेचा आमदार संजय गायकवाड यांचा जोडे मारो आंदोलन करत तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी मा.आ.डॉ.सुधीर तांबे,  दुर्गाताई तांबे,युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात,शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, अनिकेत घुले यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  याप्रसंगी बोलताना डॉ.जयश्री  थोरात म्हणाल्या की, कुणी कितीही मोठा महाराज स्वतःला म्हणून घेत असला परंतु छत्रपती शिवाजी महाराजांइतका कोणीही मोठा होणार नाही. उत्तर भारतातून काही लोक येऊन महाराष्ट्राची संस्कृती खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा फुले व आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. शूर वीरांचा महाराष्ट्र आहे. संतांचा आणि समाजसेवकांचा वारसा या मातीला लाभला आहे. महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य करत असताना त्या व्यासपीठावर आरएसएस आणि महायुतीचे मोठे नेते उपस्थित होते. अशा वेळी त्यांनी एक शब्दही बोलू नये हे अत्यंत दुर्दैवी आहे. महाराजांच्या महाराष्ट्रात आशा वक्तव्यांना माफी नाही. असे सांगताना छत्रपती शिवाजी महाराजांचा समतेचा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी युवकांनी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

शिर्डीतील समता पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणी प्रतिभा चाकणकर यांची ५ तास कसून चौकशी
काँग्रेसच्या नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील
शेतकऱ्यांनी त्यांचे सातबारे जिवंत करून घ्यावेत; प्रांताधिकारी नितीन पाटील; कर्जतमध्ये ‘महाराजस्व’ शिबीर उत्साहात

संगमनेर : संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या तथाकथित भोंदूबाबा बागेश्वर व शिंदे सेनेचा आमदार संजय गायकवाड यांचा तीव्र निषेध करत संगमनेर मध्ये हजारो नागरिकांनी एकत्र येऊन त्यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले.

संगमनेर मधील सर्व पुरोगामी संघटना व मी संगमनेरकर यांच्या वतीने बागेश्वर उर्फ धीरेंद्र शास्त्री व शिंदे सेनेचा आमदार संजय गायकवाड यांचा जोडे मारो आंदोलन करत तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी मा.आ.डॉ.सुधीर तांबे,  दुर्गाताई तांबे,युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात,शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, अनिकेत घुले यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 याप्रसंगी बोलताना डॉ.जयश्री  थोरात म्हणाल्या की, कुणी कितीही मोठा महाराज स्वतःला म्हणून घेत असला परंतु छत्रपती शिवाजी महाराजांइतका कोणीही मोठा होणार नाही. उत्तर भारतातून काही लोक येऊन महाराष्ट्राची संस्कृती खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा फुले व आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. शूर वीरांचा महाराष्ट्र आहे. संतांचा आणि समाजसेवकांचा वारसा या मातीला लाभला आहे. महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य करत असताना त्या व्यासपीठावर आरएसएस आणि महायुतीचे मोठे नेते उपस्थित होते. अशा वेळी त्यांनी एक शब्दही बोलू नये हे अत्यंत दुर्दैवी आहे. महाराजांच्या महाराष्ट्रात आशा वक्तव्यांना माफी नाही. असे सांगताना छत्रपती शिवाजी महाराजांचा समतेचा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी युवकांनी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

COMMENTS