बीड :- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी बीड येथील पत्रकार प्रतिक कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक

बीड :- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी बीड येथील पत्रकार प्रतिक कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतजी मुंडे आणि राज्य समन्वयक संतोषजी मानूरकर यांच्या नेतृत्वाखाली ही पदोन्नती जाहीर करण्यात आली. यापूर्वी प्रतिक कांबळे यांनी बीड शहराध्यक्ष म्हणून संघटनेत प्रभावीपणे काम करत विविध सामाजिक व पत्रकार हिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान दिले. त्यांच्या कार्याची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. पत्रकारिता क्षेत्रात अभ्यासपूर्ण, निर्भीड आणि वस्तुनिष्ठ लेखनातून प्रतिक कांबळे यांनी अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे. संघटनेचा विस्तार, पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे आणि राज्यभर संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रतिक कांबळे यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष वसंतजी मुंडे व राज्य समन्वयक संतोषजी मानूरकर यांनी व्यक्त केला. दरम्यान, प्रतिक कांबळे यांच्या नियुक्तीबद्दल पत्रकार, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

COMMENTS