गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, आंबेडकर चौकात निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण माजलगाव । क्रांतीसूर्य, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जय

गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, आंबेडकर चौकात निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण
माजलगाव । क्रांतीसूर्य, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त माजलगाव शहरात विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अण्णा भाऊ साठे यांचा अर्धकृती पुतळा व आकर्षक देखावा अभिवादनासाठी सजविण्यात आला होता. दिवसभर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी व मान्यवरांनी उपस्थित राहून अभिवादन केले.
जयंतीचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश सुपूर्द करण्यात आले. गणवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद दिसून आला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन करत त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि परिवर्तनवादी कार्याचे स्मरण केले. या कार्यक्रमाला शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात जयंती सोहळा पार पडला.

COMMENTS