Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आज गौतमीपुत्र कांबळे बीड दौर्‍यावर : अनिल डोंगरे

बीड प्रतिनिधी - फुले-आंबेडकरी नवयुवकांनी परिवर्तन  लढ्याला सन्मानपूर्वक आदर व्यक्त करण्यासाठी आणि फुले आंबेडकरी विचारव्युहाचे सम्यक आकलन करून घेण

महाबळेश्‍वरमध्ये मिरवणुकीत जनरेटरचा स्फोट
Solapur : नवरात्रोत्सवात कोरोना नियमांचे पालन करा… (Video)
पुढील तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरणासह रिमझिम | LOKNews24

बीड प्रतिनिधी – फुले-आंबेडकरी नवयुवकांनी परिवर्तन  लढ्याला सन्मानपूर्वक आदर व्यक्त करण्यासाठी आणि फुले आंबेडकरी विचारव्युहाचे सम्यक आकलन करून घेण्यासाठी, फुले आंबेडकरी युवा संमेलन आयोजित केले आहे. सदरील युवा संमेलन माजलगाव तालुक्यातील बाभळगाव येथे शनिवार (दि.8) रोजी  आयोजित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आंबेडकरी चळवळीतील कृतीशील विचारवंत गौतमीपुत्र कांबळे बीड दौर्‍यावर येत आहेत. तरी फुले-आंबेडकरी युवा संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वंचितचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे यांच्यासह संयोजन समितीकडून करण्यात आले आहे.
  या संमेलनाचे उद्घाटन कृषी विकास अधिकारी सुभाष साळवे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेक्युलर मुव्हमेंटचे अध्यक्ष गौतमीपुत्र कांबळे, फुले आंबेडकरी विचाराचे अभ्यासक सतिष बनसोडे असणार आहेत. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. विक्रम धन्वे हे असणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून सत्यशोधक ओबीसी परिषद प्रदेश अध्यक्ष संदीप उपरे,  महात्मा फुले आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. अशोक गायकवाड, प्रकल्प अधिकारी बाबासाहेब वाव्हळे, अभियंता वैभव मवाडे यांची उपस्थिती असणार आहे.
  या संमेलनला संयोजक म्हणून अनिल डोंगरे, मेघा आठवले, डॉ. बाळासाहेब जावळे, हनुमंत पाईक,ड.निमंत्रक म्हणून राजेश शिंदे, प्रा.राजेंद्र कोरडे, अशोक मगर, प्रा. विकास निकाळजे, प्रताप बनसोडे, किशोर सोनवणे, सुनील गायसमुद्रे,वैभव धवन, ड.अशोक वाघमारे, प्रमोद निकाळजे, गोपीनाथ गायकवाड, सुशील उजगरे, मयूर कांबळे, संदीप लोंढे, विक्रांत उजगरे तर सदरील संमेलनाचे आयोजक सिद्धार्थ मांयदळे, बाळासाहेब सोनटक्के, नवनाथ कांबळे, सुनील वावळकर, अविनाश गवळी, प्रकाशक म्हणून सुरज निकाळजे आदी कार्यकर्ते फुले-आंबेडकरी युवा संमेलनाच्या तयारीला लागले आहेत. या फुले-आंबेडकरी युवा संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचितचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे यांच्यासह संयोजन समितीकडून करण्यात आले आहे.

COMMENTS