Homeताज्या बातम्या

अहिल्यानगरमध्ये मोहरम विसर्जन मिरवणूक उत्साहात युवकांचा मोठा सहभाग;  कडेकोट पोलीस बंदोबस्त

 अहिल्यानगर : शहरात मोहरम विसर्जन मिरवणूक शुक्रवारी धार्मिक उत्साह आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडली. विविध भागांतून निघालेल्या ताजियांना भ

महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक ऐतिहासिक : माजी आ. कोल्हे   
‘वादाच्या दुनियेतील पंचगिरी’ पुस्तकाचे शिर्डीत प्रकाशन
जामखेड-माहिजळगाव मार्गावर भीषण अपघातदोन शासकीय कर्मचाऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू

 अहिल्यानगर : शहरात मोहरम विसर्जन मिरवणूक शुक्रवारी धार्मिक उत्साह आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडली. विविध भागांतून निघालेल्या ताजियांना भाविकांनी निरोप दिला. मिरवणुकीत युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. पारंपरिक ढोल-ताशांचा गजर, धार्मिक घोषणांनी शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते.कोठला फलटन चौक बारा इमाम हवेली – मंगलगेट आडते बाजार – पिंजारगल्ली – पारशाखुंट जुना कापड बाजार – देवेंद्र हॉटेल ख्रिस्त गल्ली – बुरुड गल्ली -जुना बाजार – पंचपिर चावडी – मनपा – दो बोटी चिरा मस्जिद – कोर्टाच्या मागील बाजुने – चौपाटी कारंजा -दिल्ली गेट – निलक्रांती चौक बालीकाश्रम रोड – सावेडी या मिरवणूक मार्गावरून मिरवणूक निघाली.मिरवणूक सुरळीत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अहिल्यानगर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मिरवणुकीपूर्वी अहिल्यानगर बॉम्बशोधक व नाशक पथकाने (बीडीडीएस) संपूर्ण मिरवणूक मार्गाची सखोल तपासणी केली.पोलीस उपनिरीक्षक अंबादास हुलगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार अंकुश कुलांगे, देवेंद्र सगळगिळे, संदीप बडे, सुभाष पठारे आणि रोहित कांबळे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी बॉम्बशोधक पथकातील श्वान ‘लुसी’ हिचीही मदत घेण्यात आली.मिरवणुकीदरम्यान शहरातील संवेदनशील ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक व्यवस्थेचे नियोजन, सीसीटीव्हीद्वारे देखरेख तसेच सतत गस्त ठेवून पोलिसांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करत शांतता, सलोखा आणि धार्मिक सौहार्द कायम राखल्याने मोहरम विसर्जन मिरवणूक कोणताही अनुचित प्रकार न घडता उत्साहात आणि शांततेत पार पडली.

COMMENTS