जागतिक परिचारिका दिनानिमित्त बीड येथील शासकीय जिल्हा रुग्णालय बीड येथे कार्यरत असलेल्या महिला परिचारिका तसेच वॉर्ड बॉय यांचा निर्भीड पत्रकार संघ

जागतिक परिचारिका दिनानिमित्त बीड येथील शासकीय जिल्हा रुग्णालय बीड येथे कार्यरत असलेल्या महिला परिचारिका तसेच वॉर्ड बॉय यांचा निर्भीड पत्रकार संघ बीड यांच्या वतीने फुल देऊन सन्मान करण्यात आला. आरोग्य सेवेत अहोरात्र कार्य करणार्या परिचारिका आणि कर्मचार्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानून दिवस-रात्र रुग्णांची सेवा करणार्या परिचारिकांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले. कोरोना काळापासून ते आजपर्यंत आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या सेवाभावाचा गौरव करण्यासाठी निर्भीड पत्रकार संघाच्या वतीने हा छोटेखानी पण हृदयस्पर्शी सन्मान सोहळा पार पडला. यावेळी नर्सिंग कॉलेजच्या प्राध्यापक श्रीमती बेद्रे मॅडम यांच्यासह रुग्णालयातील परिचारिका, वॉर्ड बॉय तसेच अन्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच निर्भीड पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष किरण डोळस आणि जिल्हाउपाध्यक्ष मोनिका बेदरे यांनी उपस्थित राहून परिचारिका व कर्मचार्यांचा सन्मान केला. सन्मान स्वीकारताना परिचारिकांनी आनंद व्यक्त करत समाजाकडून मिळणारे प्रोत्साहन हीच आमच्यासाठी खरी ऊर्जा असल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण आणि भावनिक झाले होते. आरोग्य सेवेत कार्य करणार्या कर्मचार्यांचा सन्मान करून निर्भीड पत्रकार संघाने सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल उपस्थितांकडून कौतुक व्यक्त करण्यात आले.

COMMENTS