Homeताज्या बातम्या

यश फाउंडेशनचा वृक्षारोपण उपक्रम उत्साहात

शेवगाव : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत यश फाउंडेशन, जोहरापूर यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण अभियानाला ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शिक्ष

पंचनाम्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढवा३३ टक्के नुकसानभरपाईच्या अटीचा पुनर्विचार करा ; आ. कोल्हेंनी विधानभवनात वेधले लक्ष  
अल्पसंख्याक मुस्लिम संरक्षण कायद्यासाठी जनजागृती मोहीम; राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद22 जूनच्या अधिवेशनादरम्यान मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण आंदोलन
खा. वाकचौरे यांचा कोपरगावात निषेध

शेवगाव : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत यश फाउंडेशन, जोहरापूर यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण अभियानाला ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘एक झाड लावूया… पर्यावरण वाचवूया’ या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमात पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी वृक्षारोपणासह पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेण्यात आली.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सतीश बापू पवार होते. प्रमुख उपस्थितीत ग्रामविकास अधिकारी संजय पालवे, डॉ परमेश्वर ढगे, प्रा. एम. एस. एम, माजी सरपंच बापूसाहेब सोनवणे, दिनेशराव पालवे, सुरेश पंडित, अशोक पंडित (दादासाहेब देवढे), अशोक देवढे पाटील, परिसरातील शिक्षकवृंद, ग्रामस्थ तसेच यश फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी ग्रामविकास अधिकारी संजय पालवे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवडीचे महत्त्व अधोरेखित केले.  
अध्यक्षीय भाषणात सरपंच सतीश पवार यांनी यश फाउंडेशनच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक करत, “निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे,” असे मत व्यक्त केले.
यश फाउंडेशनच्या कार्याचा आढावा देताना संस्थेच्या प्रतिनिधींनी अल्पावधीतच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविल्याची माहिती दिली. यावेळी प्रगतशील बागायतदार अशोकराव पंडित (दादासाहेब देवढे) यांनी पावसाळ्यापर्यंत १०० आंब्यांची रोपे लावण्याचा संकल्प जाहीर केला.  
 कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि जैवविविधतेचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शेवटी सर्वांनी वृक्षसंवर्धनाची सामूहिक शपथ घेत पर्यावरण रक्षणासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान प्रा. अमोल तागड यांनी विद्यार्थ्यांसाठी वर्षभर मोफत इंग्रजी व्याकरण मार्गदर्शन वर्ग सुरू करण्याची घोषणा केली. 

COMMENTS