Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दीड लाखाची लाच घेतांना पोलिस हवालदाराला अटक

पुणे : पुण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत एका पोलिस हवालदाराला दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या घटनेमु

कर्जतमध्ये पोलीस कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात 
नागपुरात 5 लाखांची लाच घेणार्‍या अधिकार्‍याला अटक
जन्म दाखल्यासाठी ३ हजारांची लाच; जामखेड नगरपरिषदमधील घटना; दोघांना तीन दिवसांची कोठडी
Pune Police Constable Arrested: Bribery Case Koregaon Park | पुणे: दीड  लाखाची लाच घेणारा हवालदार अटकेत

पुणे : पुण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत एका पोलिस हवालदाराला दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या घटनेमुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, कारवाईदरम्यान आरोपी हवालदाराने पळून जाण्याचा प्रयत्न करत तक्रारदाराच्या छातीवर चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश शहाजी कसपटे असे अटक करण्यात आलेल्या हवालदाराचे नाव आहे. तक्रारदार ज्या खासगी संस्थेत काम करतो, त्या संस्थेच्या मालकाविरुद्ध हैदराबाद येथील न्यायालयात धनादेश अनादर प्रकरणी खटला सुरू आहे. या प्रकरणात न्यायालयाने संबंधित व्यक्तीविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. हे वॉरंट अंमलात आणले जाऊ नये तसेच संबंधित व्यक्तीला अटक टाळण्यासाठी मदत करावी, यासाठी कसपटे याने सुरुवातीला अडीच लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. नंतर तडजोडीअंती दीड लाख रुपयांवर व्यवहार ठरल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. विभागाने प्राथमिक पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्याचा निर्णय घेतला. बुधवारी दुपारी बोट क्लब रस्त्यावरील एका सोसायटीसमोर पथकाने कारवाई केली. हवालदाराने लाचेची रक्कम स्वीकारताच अधिकार्‍यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारवाईची माहिती मिळताच त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने तक्रारदारावर हल्ला करत छातीवर चावा घेतला तसेच अधिकार्‍यांशी झटापट केल्याची माहिती समोर आली आहे. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेत अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS