Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपुरात 5 लाखांची लाच घेणार्‍या अधिकार्‍याला अटक

नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, महसूल सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या एका अधिकार्‍याल

गोरेगाव ‘नेस्को’ ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट; बॉलिवूड कनेक्शन उघड, सीसीटीव्हीमुळे खळबळ!
छत्तीसगडमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने चिमुकलीला चिरडले; पोलिसांनी ५५ किमी पाठलाग करत चालकाला ठोकल्या बेड्या
जन्म दाखल्यासाठी ३ हजारांची लाच; जामखेड नगरपरिषदमधील घटना; दोघांना तीन दिवसांची कोठडी
Nagpur News: 5 लाख की रिश्वत लेते रंगेहाथ दबोचा गया राजस्व सहायक, नागपुर  में एंटी करप्शन की बड़ी कार्रवाई | Revenue assistant caught red-handed  accepting a bribe of Rs 5 lakh, major

नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, महसूल सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या एका अधिकार्‍याला पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर-महाल परिसरातील नझुल भूखंडावरील बांधकामासंदर्भातील अपील प्रकरण अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित होते. हे प्रकरण अनुकूलरीत्या निकाली काढण्यासाठी संबंधित अधिकार्‍याने तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानंतर विभागाने 17 आणि 20 एप्रिल रोजी मागणीची पडताळणी केली असता, लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने सापळा रचण्याचा निर्णय घेण्यात आला. ठरल्याप्रमाणे नंदनवन परिसरात शुक्रवारी उशिरा रात्री तक्रारदाराने पंचांसमक्ष आरोपीला रक्कम दिली. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने तात्काळ कारवाई करत संबंधित अधिकार्‍याला अटक केली. अंगझडतीदरम्यान पाच लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, जप्त रकमेमध्ये काही बनावट नोटांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे. दरम्यान, या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या गैरप्रकारांविरोधात पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

COMMENTS