Homeताज्या बातम्या

योगा दिनानिमित्ताने १५१ सूर्यनमस्कारांचा संकल्प यशस्वी  

शिर्डी :आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तने ओम योगा स्टुडिओ व योग शिक्षिका शुभांगी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली १५१ सूर्यनमस्कारांचा यशस्वी उपक्रम

श्री धर्मनाथ विद्यालयात योग दिन उत्साहात  
योगामुळे आत्मिक उन्नती होते : गोसावी
योग मानवी चेतनेशी जोडणारा सेतू : पंतप्रधान मोदी


शिर्डी :आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तने ओम योगा स्टुडिओ व योग शिक्षिका शुभांगी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली १५१ सूर्यनमस्कारांचा यशस्वी उपक्रम साई परिवार लान्स मध्ये उत्साहात पार पडला. शिर्डी येथील योग शिक्षिका शुभांगी देशमुख यांनी योगा आंतरराष्ट्रीय दिनानिमित्ताने महिलांसाठी योग साधनेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व वयोगटातील महिला व योगसाधकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत निरोगी जीवनाचा संदेश दिला.
योगा, एरियल योगा, फेस योगा व झुंबा प्रशिक्षिका शुभांगी देशमुख या ऑफलाईन तसेच ऑनलाईन वर्ग घेत असून त्यांच्या नियमित प्रशिक्षणामुळे सहभागी योगिनींनी १५१ सूर्यनमस्कार संकल्प पूर्ण करत एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले.
या योग शिक्षिका शुभांगी देशमुख म्हणाल्या, “योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक जीवनशैलीची गुरुकिल्ली आहे. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा स्वीकार करावा.” जेने करून आपलं आयुष्य निरोगी राहण्यास मदत होईल असे त्या म्हणाल्या.  यावेळी योग साधणे साठी सबिता वेलंगर, गायत्री गंगावणे,योगिता राजपूत,सांची लोकचंदानीं, निधी लोकचंदानीं,सीमा डहाळे,मंगलताई तस्कर,कांचन शिंदे,मनीषा घुले,भाग्यश्री सोनवणे,सारिका मांडवडे,आकांक्षा वाडेकर,उमा सिंग,रंजना पगार,स्वाती परदेशी,नम्रता नागरे,गौरी नागरे,संगीता जगताप,मोनिका कटारनवरे,रोहिणी पारखे आधी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

COMMENTS