Homeताज्या बातम्या

श्री धर्मनाथ विद्यालयात योग दिन उत्साहात  

जवळा : पारनेर तालुक्यातील जवळा येथील श्री धर्मनाथ विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ज्ञानदेव पठारे यांच्या मा

तीन वर्षांनंतर वन पर्यटन केंद्र सुरू; आत मात्र दुरावस्था लाखोंची सौर यंत्रणा निष्क्रिय; चोरी, देखभालीच्या अभावामुळे वन विभागावर प्रश्नचिन्ह
श्रीक्षेत्र पिंपळनेरवरून निळोबारायांच्या पालखीचे उद्या प्रस्थान
प्राचीन कातळशिल्पांच्या संवर्धनाला नवी दिशाविधानसभेत आ.विक्रम पाचपुते यांचा मुद्दा, शासनाची सकारात्मक भूमिका


जवळा : पारनेर तालुक्यातील जवळा येथील श्री धर्मनाथ विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ज्ञानदेव पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम तसेच कवायतींचे सादरीकरण केले.
 कार्यक्रमात पद्मासन, ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, हलासन, सर्वांगासन, शलभासन, धनुरासन, चक्रासन, शीर्षासन, वीरभद्रासन, सेतुबंधासन, मयूरासन आदी योगासनांचा सराव करण्यात आला. योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्थैर्य, एकाग्रता आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
 यावेळी आंतरराष्ट्रीय योगदिनाचे महत्त्वही विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. योगाभ्यासाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक लाभ समाजापर्यंत पोहोचावेत, तसेच निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने दरवर्षी २१ जून रोजी हा दिवस जगभर साजरा केला जातो. भारताच्या पुढाकारातून संयुक्त राष्ट्रांनी २०१४ मध्ये या दिवसाला मान्यता दिल्यानंतर २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला.
  नियमित योगाभ्यासामुळे शरीराची लवचिकता वाढते, ताण-तणाव कमी होतो, प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि मन प्रसन्न राहते. मयूरासन व शीर्षासन या योगासनांमध्ये आशिया गिनीज विक्रमाची नोंद असल्याचे सांगत, तो विक्रम मोडण्याचे आव्हान ज्ञानदेव पठारे यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच सातत्याने योगाभ्यास करून निरोगी जीवन जगण्याचे आवाहनही त्यांनी केले.

COMMENTS