Homeताज्या बातम्याबीड

अंबानगरीत श्री गजानन विजय ग्रंथाच्या सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन.काल्याचे कीर्तन, दीपोत्सव व महाप्रसादाने होणार सांगता.

येथील श्री संत गजानन महाराज भक्त मंडळाच्या वतीने श्री गजानन विजय ग्रंथाच्या चार दिवसीय सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन 26 मे ते 29 मे दरम्या

द्रौपदी सोळंके यांच्या तेरावीनिमित्त रविवारी कीर्तन सेवेचे आयोजनह.भ.प.वासुदेव बाबा टाकळीकर यांचे कीर्तन
तर्कशक्ती, अध्यात्म आणि समाजप्रबोधनाचा अनोखा संगमह.भ.प. राजू महाराज लोखंडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवपद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने व अभिनेत्री मेघना झुझम यांच्या हस्ते सन्मान
समजूतदारपणा हीच मोठेपणाची खरी ओळखमहंत उद्धव महाराज मंडलिक ; देवळाली प्रवरा येथे श्रीराम कथेची सांगता

येथील श्री संत गजानन महाराज भक्त मंडळाच्या वतीने श्री गजानन विजय ग्रंथाच्या चार दिवसीय सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन 26 मे ते 29 मे दरम्यान सकाळी 7 ते 10 या वेळेत शहरातील देशपांडे गल्लीतील धाकटे देवघर येथे करण्यात आले आहे. सोहळ्याची सांगता शुक्रवार, 29 मे रोजी सकाळी 10 वाजता हभप शिवाजी महाराज मुळे (आडस) यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार असून, त्यानंतर पालखी उत्सव, महाआरती, महाप्रसाद, ‘सत्संग श्री गजाननाचा’ तसेच ‘श्रीं’ची दीपोत्सवात शेजारती होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे. या पारायण सोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ अंबाजोगाई शहर व पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री संत गजानन महाराज भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.शहरातील श्री संत गजानन महाराज भक्त मंडळाच्या वतीने हभप वै. दत्तात्रय जोशी महाराज नळेगावकर यांच्या कृपाआशीर्वादाने गेली 13 वर्षे श्री गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायण सोहळे तसेच भक्ती संगीत, कीर्तन व पालखी उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी 26 मे ते 29 मे 2026 दरम्यान पारायण सोहळ्याचे आयोजन देशपांडे गल्लीतील धाकटे देवघर येथे करण्यात आले असून, यंदाचे हे 14 वे वर्ष आहे.चार दिवसीय पारायण सोहळा प्रमुख हभप आनंद महाराज जोशी नळेगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 7 ते 10 या वेळेत पार पडणार आहे. अधिक ज्येष्ठ शुद्ध 11, मंगळवार, 26 मे रोजी पहाटे 4 वाजता मंगलध्वनीने सोहळ्याची सुरुवात होणार आहे. पहाटे 5 वाजता ‘श्रीं’ना रुद्राभिषेक व आरती होईल. त्यानंतर सकाळी 7 ते 10 या वेळेत श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण, महाप्रसाद तसेच सायंकाळी 5 वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी महिला भजनी मंडळाचे सांप्रदायिक भजन होणार आहे. सायंकाळी 6.30 वाजता हभप श्रीपाद बुवा अभ्यंकर, पिंपरी-चिंचवड (पुणे) यांचे कीर्तन होईल.27 मे रोजी पारायण, आरती तसेच सायंकाळी 5 वाजता सरोजनी देशपांडे, वैशाली विडेकर व मधुरा बाभुळगावकर यांचे भक्ती संगीत होणार असून, सायंकाळी 6.30 वाजता हभप प्रभंजन महाराज भगत (लोणी) यांचे कीर्तन होईल.
गुरुवार, 28 मे रोजी अध्याय 15 ते 21 चे पारायण, त्यानंतर ग्रंथपूजन, ग्रंथदिंडी, पारायण आरती तसेच श्री गजानन महाराजांचा पालखी उत्सव होणार आहे. सायंकाळी 5 वाजता अंबानगरीतून ‘श्रीं’चा पालखी सोहळा धाकटे देवघर, देशपांडे गल्ली – बाजीप्रभू चौक – केशवनगर रोड – दीनदयाळ कॉलनी – श्री गजानन महाराज मंदिर, चौसाळकर कॉलनी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – कुत्तर विहीर – देशपांडे गल्ली – धाकटे देवघर या मार्गाने निघणार आहे.दि. 29 मे रोजी पहाटे 5 वाजता ‘श्रीं’ना रुद्राभिषेक व आरती होईल. सकाळी 10 वाजता हभप शिवाजी महाराज मुळे (आडस) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर मंडळाच्या वतीने ‘कै. दत्तात्रय महाराज जोशी स्मृती आध्यात्मिक सेवा पुरस्कार’ हभप रामचंद्र महाराज चिंचोलकर, संभाजीनगर (मुख्य प्रवर्तक, श्रीक्षेत्र पैठण ते श्रीक्षेत्र शेगाव पायी दिंडी सोहळा) यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यानंतर महाआरती व महाप्रसाद होणार आहे.रात्री 8 वाजता श्री संत गजानन महाराज भक्त मंडळ, अंबाजोगाई संचलित ‘सत्संग श्री गजाननाचा’ तसेच ‘श्रीं’ची दीपोत्सवात शेजारती होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
पारायण सोहळा, श्रीची मिरवणूक व विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ अंबाजोगाई शहर व पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री संत गजानन महाराज भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS