Homeताज्या बातम्या

योगामुळे आत्मिक उन्नती होते : गोसावी

शेवगाव : योग व प्राणायामाची जगाला ओळख करून देणारा हा दिवस आहे. शरीर, मन आणि आत्म्याचे संतुलन राखणारा योग हा एकमेव मार्ग आहे. योगामुळे आत्मिक उन्न

राज्यपालांचा भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकार्‍यांसमवेत योगाभ्यास
महात्मा फुले कृषि विद्यापीठात योगदिन उत्साहात  
योग मानवी चेतनेशी जोडणारा सेतू : पंतप्रधान मोदी


शेवगाव : योग व प्राणायामाची जगाला ओळख करून देणारा हा दिवस आहे. शरीर, मन आणि आत्म्याचे संतुलन राखणारा योग हा एकमेव मार्ग आहे. योगामुळे आत्मिक उन्नती होते. योग हा भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे असे प्रतिपादन ग्रेट वेलनेस कोच शंकरराव गोसावी यांनी केले. ते कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे शहरटाकळी हायस्कूल येथे आयोजित योग दिन कार्यक्रम प्रसंगी   बोलत होते.
यावेळी योग गुरु महेश भालेराव, हरिश्चंद्र भालके साहेब, संदीप गादे, प्राचार्या अंजली चिंतामण, पर्यवेक्षक पोपट खताळ, सहशिक्षिका कमल तुळसे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
 पुढे बोलताना गोसावी म्हणाले की, नियमित योग प्राणायाम केल्यामुळे शरीराची कार्यक्षमता वाढते.   आपल्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी सकस संतुलित आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. नियमित व्यायाम केल्यामुळे आपल्याला थकवा, आळस येत नाही. यावेळी १२०० हून अधिक विद्यार्थी व शिक्षकांनी योग गुरु महेश भालेराव , शंकरराव गोसावी साहेब, हरिश्चंद्र भालके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली योगा प्राणायामाचे धडे गिरवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ काटे यांनी केले तर आभार निसार शेख यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS