Homeताज्या बातम्या

ढवळगाव शिवारात गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे जप्तदोन आरोपींना अटक ; बेलवंडी पोलिसांची कामगिरी

श्रीगोंदा : तालुक्यातील ढवळगाव शिवारात विनापरवाना गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे बाळगून त्यांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोन आरोपींना बेल

युवतीसोबत गैरवर्तन; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, संशयित मुलगा ताब्यात
श्रीरामपूर येथील एका डॉक्टरला बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी आरोपींना १० मेपर्यंत पोलीस कोठडी
शेवगावात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश ; तिघांविरुद्ध गुन्हा


श्रीगोंदा : तालुक्यातील ढवळगाव शिवारात विनापरवाना गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे बाळगून त्यांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोन आरोपींना बेलवंडी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई १९ जून रोजी ढवळगाव येथील हॉटेल रिलॅक्स परिसरात करण्यात आली.
बेलवंडी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, काही व्यक्ती गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन येणार आहेत. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने ढवळगाव शिवारातील हॉटेल रिलॅक्स येथे सापळा रचला.
दरम्यान, संशयित व्यक्ती घटनास्थळी आल्यानंतर पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत त्यांना शिताफीने पकडले. अंगझडती घेतली असता आरोपी सचिन विलास शिंदे (वय ३५, रा. निंबवी, ता. श्रीगोंदा) याच्याकडून एक विनापरवाना गावठी कट्टा, तर दीपक सिताराम शिंदे (रा. ढवळगाव) याच्याकडून दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
पोलिसांनी चौकशी केली असता, आरोपींनी हा गावठी कट्टा तुषार तांबे याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याची माहिती दिली. त्यानुसार बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर करीत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्यासह पोलीस हवालदार भाऊसाहेब यमगर, धर्मराज दहिफळे आदींनी, संदीप गवारे, भाऊसाहेब शिंदे, पोलीस नाईक शरद गांगर्डे, पोलीस शिपाई कैलास शिपणकर, दादासाहेब क्षीरसागर, विकास सोनवणे, राजू भोर आदींनी सहभाग घेतला.

COMMENTS