Homeताज्या बातम्या

भुईकोट किल्ल्यावर ‘योग संगम’१७ महाराष्ट्र बटालियनतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

अहिल्यानगर: जागतिक योग दिनाचे औचित्य साधून १७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, अहिल्यानगरच्या वतीने स्थानिक ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या विस्तीर्ण प्रा

ओढे-नाले साफसफाईची महापालिकेकडून निव्वळ धुळफेक
कौटुंबिक वादातून मारहाण; जावयाचा मृत्यू; पत्नी अटकेत, सासूवरही संशय
नालेगावमध्ये संत गोरोबा काका समाधी सोहळा उत्साहात   


अहिल्यानगर: जागतिक योग दिनाचे औचित्य साधून १७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, अहिल्यानगरच्या वतीने स्थानिक ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या विस्तीर्ण प्रांगणात ‘योग संगम’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या भुईकोट किल्ल्यावर पहाटेच्या प्रसन्न वातावरणात शेकडो एनसीसी कॅडेट्सनी एकत्र येत योगसाधना केली आणि ‘आरोग्यसंपन्न जीवनाचा’ संकल्प सोडला.
 या विशेष योग महोत्सवासाठी १७ महाराष्ट्र बटालियनचे प्रशासकीय अधिकारी कर्नल निकेत सिंग नेगी प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात कर्नल नेगी यांनी कॅडेट्सना शारीरिक आणि मानसिक सक्षमतेसाठी योगाचे महत्त्व पटवून दिले.
  या प्रसंगी प्रसिद्ध योग शिक्षिका साजरी परदेशी आणि पूनम वाछात्नी यांनी उपस्थित कॅडेट्स व शिक्षकांना योग प्रशिक्षण दिले. त्यांनी आयुष मंत्रालयाच्या अधिकृत शासकीय प्रोटोकॉलनुसार विविध योगासने, मुद्रा आणि प्राणायामाचे प्रकार अत्यंत सोप्या पद्धतीने करून घेतले. प्रत्येक आसनाचे शरीरावर होणारे परिणाम आणि त्याचे वैज्ञानिक महत्त्व त्यांनी प्रात्यक्षिकांसह समजावून सांगितले.
  या ‘योग संगम’ कार्यक्रमात अहिल्यानगरमधील प्रमुख शिक्षण संस्थांच्या एनसीसी युनिट्सनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. यामध्ये अहमदनगर कॉलेज, अहिल्यानगर, न्यू आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, अहिल्यानगर, दादा चौधरी माध्यमिक शाळा, रेसिडेन्शियल हायस्कूल, आर्मी पब्लिक स्कूल, भाऊसाहेब फिरोदिया शाळा, या सर्व शाळा व महाविद्यालयांमधील छात्र सैनिकांनी (कॅडेट्स) अत्यंत शिस्तीत आणि उस्फूर्तपणे सर्व आसने पूर्ण केली.
 हा सोहळा यशस्वी करण्यासाठी बटालियनच्या मार्गदर्शनाखाली विविध महाविद्यालये आणि शाळांचे सहयोगी एनसीसी अधिकारी  व लष्करी कर्मचारी  उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने लेफ्टनंट डॉ. एम. एस. जाधव, लेफ्टनंट भरत होळकर, सीटीओ नेटके, थर्ड ऑफिसर गणेश भापकर, चोभे सर, विकास साबळे, तसेच बटालियनचे सुभेदार मेजर राजेश राव, मोरे सर आणि इतर पी.आय. स्टाफ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सुरुवात लेफ्टनंट डॉ. एम. एस. जाधव यांच्या प्रास्ताविक भाषणाने झाली. लेफ्टनंट भरत होळकर यांनी आभार मानले.

COMMENTS