Homeताज्या बातम्यापुणे

देशभरात 20 मे रोजी औषध विक्रेत्यांचा संपऑनलाईन औषध विक्री आणि मोठ्या कंपन्यांच्या स्पर्धेविरोधात आंदोलन

पुणे : देशभरातील औषध विक्रेत्यांनी 20 मे रोजी एकदिवसीय बंदची घोषणा केली असून, बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री तसेच मोठ्या व्यावसायिक साखळ्यांकडून वा

महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी टाळेबंदी
नांदेडच्या शिवसेनेत अंतर्गत रणधुमाळी; आ. बालाजी कल्याणकरांना खिंडीत पकडण्याची मोहीम?
दोन चिमुकल्यांचा गाळात फसल्याने मृत्यू


पुणे : देशभरातील औषध विक्रेत्यांनी 20 मे रोजी एकदिवसीय बंदची घोषणा केली असून, बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री तसेच मोठ्या व्यावसायिक साखळ्यांकडून वाढणार्‍या स्पर्धेविरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह देशातील सुमारे बारा लाखांहून अधिक औषध विक्रेते या बंदमध्ये सहभागी होतील, अशी माहिती पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
औषध विक्रेत्यांच्या संघटनांनी सांगितले की, औषध व्यवसाय हा औषधे आणि प्रसाधने नियंत्रण कायद्यांतर्गत नियंत्रित केला जातो. मात्र, ऑनलाईन पद्धतीने औषध विक्रीसंदर्भात स्पष्ट कायदेशीर तरतूद अद्याप अस्तित्वात नाही. केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी यासंदर्भात अधिसूचना जारी केली होती, परंतु त्याला अद्याप कायद्याचे स्वरूप प्राप्त झालेले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने औषधांची विक्री सुरू असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. संघटनांच्या मते, कोरोना काळात घरपोच औषध वितरणासाठी देण्यात आलेल्या सवलतीचा काही ऑनलाईन कंपन्या अजूनही गैरवापर करत आहेत. त्यामुळे पारंपरिक औषध विक्रेत्यांवर आर्थिक दबाव वाढत असून, ग्रामीण आणि लहान शहरांमधील औषध पुरवठा व्यवस्थेलाही धोका निर्माण होत आहे. मोठ्या व्यावसायिक कंपन्यांकडून औषधांवर मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या जात असल्याने छोट्या औषध विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याची भावना संघटनांनी व्यक्त केली. सध्याच्या नियमांनुसार किरकोळ विक्रेत्यांना मर्यादित नफा मिळत असल्याने स्पर्धेत टिकून राहणे कठीण जात असल्याचे त्यांनी नमूद केले. औषध विक्रेत्यांनी सरकारकडे काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये किरकोळ विक्रेत्यांवरील नफ्याची मर्यादा हटवणे, पर्यायी औषधे देण्याचा अधिकार मिळणे आणि ऑनलाईन औषध विक्रीवर कठोर नियंत्रण आणणे या मागण्यांचा समावेश आहे. या संदर्भात केंद्र सरकारकडे वारंवार निवेदने देऊनही ठोस निर्णय झाला नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनांनी स्पष्ट केले. राज्यातील बंद शंभर टक्के यशस्वी होईल, असा दावा संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे. सरकारने समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

COMMENTS