Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

ठाकरेंच्या खासदारांने घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट

मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्षांतराच्या चर्चांना वेग आला असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील काही खासदार उपमुख्यमंत्री एकना

लाडक्या बहिणींना ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ;30 एप्रिलपर्यंत करता येणार दुरूस्ती : मंत्री अदिती तटकरे
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ‘OSD’ सांगून फसवणूक
अवकाळीचा तडाखा !


मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्षांतराच्या चर्चांना वेग आला असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील काही खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागेश पाटील आष्टीकर यांनी मुंबईतील शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीमागील नेमके कारण अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नसले, तरी राज्यात सुरू असलेल्या तथाकथित वाघ मोहीमेच्या चर्चेमुळे या भेटीकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. आष्टीकर यांच्या समर्थकांकडून मात्र ही भेट मतदारसंघातील विकासकामे, प्रलंबित प्रश्‍न आणि निधी यांसंदर्भात झाल्याचे सांगितले जात आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विविध कामांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याच्या उद्देशाने त्यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील काही लोकप्रतिनिधी शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सातत्याने सुरू आहेत. काही नेत्यांकडून ठाकरे गटातील अनेक खासदार भविष्यात शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करू शकतात, असे दावेही करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रत्येक भेटीकडे आता राजकीय समीकरणांच्या दृष्टीने पाहिले जात आहे. यापूर्वीही काही खासदार आणि नेत्यांच्या भेटींमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्याबाबतही विविध चर्चा सुरू असून, त्यांनी भूमिका बदलणार का याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी इतर खासदारांच्या झालेल्या भेटींनंतर आता नागेश पाटील आष्टीकर यांच्या भेटीमुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे.

COMMENTS