Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वीजचोरी प्रकरणी दोन वर्षाचा तुरुंगवास; अहमदनगर न्यायालयाचा निकाल

मुंबई / प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्यातील निंबळक, ता. जि. अहमदनगर येथील ग्राहकास वीजचोरी करणे महागात पडले आहे. वीज चोरीप्रकरणी पाराजी नारायण रोकड

महाविद्यालयीन युवकाशी अनैसर्गिक संबंध ठेवल्याप्रकरणी हावलदाराविरुध्द गुन्हा दाखल
ठाण्यात एका रात्रीत उपचारादरम्यान 17 रुग्णांच्या मृत्यू; अहवाल आल्यानंतर कारवाई करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे संकेत
सज्जनगडावरील समाधी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले

मुंबई / प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्यातील निंबळक, ता. जि. अहमदनगर येथील ग्राहकास वीजचोरी करणे महागात पडले आहे. वीज चोरीप्रकरणी पाराजी नारायण रोकडे यांना अहमदनगर न्यायालयाने दोन वर्षाच्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. या ग्राहकाने वीजमीटरमध्ये छेडछाड करून 34 हजार 129 वीज युनिटची, आर्थिक मुल्याप्रमाणे 4 लाख 24 हजार 280 रूपयांची वीजचोरी केली होती.
दि. 8 नोव्हेंबर 2016 रोजी निंबळक, ता. जि. अहमदनगर येथील वीज ग्राहक पाराजी नारायण रोकडे यांचे अजित फूड्स या कंपनीच्या वीज मीटरची तपासणी करण्यात आली होती. त्यात वीज जोडणी मीटरमधील दोन स्टड कापून वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करत असल्याबाबत निदर्शनास आले होते. ग्राहकाने 8 नोव्हेंबर 2016 रोजीच्या 3 महिने आधीपासून 34 हजार 129 युनिटची वीजचोरी केली आहे. ग्राहकास वीजचोरीच्या युनिटचे आर्थिक मुल्यानुसार 4 लाख 24 हजार 280 इतकी वीजचोरी केल्याचे दिसून आले होते. गुन्ह्यासाठी तडजोड आकार 10 लाख आरोपीने भरला नाही. त्यामुळे किरण महाजन यांनी महावितरणच्या विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये पाराजी नारायण रोकडे यांच्याविरूध्द एमएससीबी पोलीस स्टेशन नाशिक येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी झालेल्या सुनावणीत अहमदनगर न्यायालयाने आरोपीस दोन वर्षाची सक्तमजुरी व 15 हजार रुपये दंडाची, दंड न भरल्यास एक महिन्याची सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली.
यामध्ये फिर्यादी यांच्यासह रमाकांत गरजे, रोहन धर्माधिकारी सहाय्यक अभियंता, महावितरण तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता लालचंद भराडे या साक्षीदारांची साक्ष तांत्रिक बाबीचा अनुषंगाने नोंदविण्यात आली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता उज्ज्वला थोरात-पवार यांनी कामकाज पाहिले.

COMMENTS