Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्थानकाजवळील पुतळ्याचे सुशोभीकरण होणार

मुंबई, दि. ९ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्टेशनजवळ असलेल्या पुतळ्याचे आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. पुतळ्याचे

चेंबूर लालडोंगर एसआरए प्रकल्पातील समस्यांवर तातडीने कार्यवाही होणार – मंत्री शंभूराज देसाई
राज्यात उष्णतेचा तडाखा; उष्माघाताच्या रूग्णसंख्येत वाढ; पंढरपुरात उष्माघाताने तरूणाचा मृत्यू; आरोग्य विभाग सतर्क
कारवाई की पाठराखण? नियंत्रण कक्षातून थेट वाहतूक शाखेत मारोती मुंडे यांची नियुक्ती; पोलीस दलात चर्चेला उधाण

मुंबई, दि. ९ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्टेशनजवळ असलेल्या पुतळ्याचे आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. पुतळ्याचे दुरुस्तीकार्य तसेच पाठीमागील भिंतीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले कार्य, महेश्वर येथील राजवाडा, इंदोर येथील वास्तूशिल्प, काशीविश्वनाथ मंदिराचा केलेला जीर्णोद्धार, वृक्षसंवर्धन या बाबींचा देखावा आकर्षक स्वरुपातील प्रकाश योजनेसह मांडण्यात येणार आहे.

आज महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महापालिका सहायक आयुक्त श्री.जयदीप मोरे आणि अन्य अधिकारी तसेच डॉ.असिम गोकर्ण हरवंश यांची या कामासंदर्भात बैठक झाली.

हे काम दिनांक १५ मे, २०२५ च्या आत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. दिनांक ३१ मे, २०२५ रोजी पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती आहे. या जन्म त्रिशताब्दी निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा हा सुशोभित आणि पुष्पमंडित पुतळा तयार करण्यात येत आहे.

COMMENTS