Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पार्थ समर कॅम्पमुळे बालकांना नवी दिशा : डॉ. संदीप पवार

पाथर्डी : छोट्या शहरांतील बालकांना अभ्यासाच्या तणावातून मुक्त करत मनोरंजनासोबतच विविध कौशल्ये शिकण्याची संधी देणारा पार्थ समर कॅम्प हा स्तुत्य उप

नेदरलँडच्या संशोधिकेची गारगोटी संग्रहालयाला भेट
शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा : घोगरे; आ.संजय गायकवाड, धिरेंद्र शास्त्री यांचा तीव्र निषेध
‘एनएमएमएस’ परीक्षेत वेदिका सूर्यवंशी तालुक्यात प्रथम

पाथर्डी : छोट्या शहरांतील बालकांना अभ्यासाच्या तणावातून मुक्त करत मनोरंजनासोबतच विविध कौशल्ये शिकण्याची संधी देणारा पार्थ समर कॅम्प हा स्तुत्य उपक्रम असून अशा शिबिरांमुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे प्रतिपादन डॉ. संदीप पवार यांनी केले.

येथील विवेकानंद विद्या मंदिरच्या प्रांगणात अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठान आयोजित ‘पार्थ समर कॅम्प २.०’च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मैत्रेयी ग्रुपच्या अध्यक्षा कविताताई आव्हाड, आरोग्यदीप हॉस्पिटलचे संचालक अभिजित पवार, पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे सचिव दिलीपराव गर्जे, कुणाल आव्हाड, अशोकराव चोरमले, प्राचार्य डॉ. बबन चौरे, प्रतीक्षा आव्हाड, डॉ. विजय देशमुख आदी उपस्थित होते.

डॉ. पवार पुढे म्हणाले की, पूर्वी समर कॅम्प मोठ्या शहरांपुरते मर्यादित होते. ग्रामीण भागातील व छोट्या शहरांतील मुलांना आर्थिक व कौटुंबिक कारणांमुळे अशा शिबिरांमध्ये सहभागी होता येत नव्हते. मात्र पार्थ समर कॅम्पमुळे स्थानिक स्तरावरच मुलांना विविध उपक्रमांचा लाभ मिळत आहे. हा कॅम्प केवळ खेळांपुरता मर्यादित नसून मुलांची सर्जनशीलता वाढविण्यासाठी विविध कौशल्याधारित उपक्रम राबविण्यात आले.

आठवडाभर चाललेल्या या कॅम्पमध्ये पाथर्डी शहरातील १२२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षित क्रीडाशिक्षकांकडून व्हॉलीबॉल, क्रिकेट, आर्चरी, एरोबिक्स, योगा यांसह कुंभारकला, पॉट पेंटिंग, क्राफ्ट, सामान्यज्ञान, इंग्रजी फनी गेम्स, अबेकस, नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विविध स्पर्धांमधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.

पर्यावरणपूरक संदेश देण्यासाठी मान्यवरांना वनस्पती रोप भेट देण्यात आले. या कॅम्पसाठी कला शिक्षक दीपक राठोड, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विजय देशमुख, क्रीडाशिक्षक साईनाथ ढाकणे, सचिन माळवदे, भारत राठोड, ऋषी चौरे, गीता कोलते, पायल असलकर, प्रमोद हंडाळ, मुख्याध्यापिका अनुजा कुलकर्णी, पर्यवेक्षक संपत घारे, समन्वयक ज्ञानेश्वर गायके, सतीश डोळे, संदीप धायतडक, विठ्ठल धस आदींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुणाल आव्हाड यांनी केले, सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गायके यांनी केले तर आभार प्रदर्शन संपत घारे यांनी मानले.

COMMENTS