Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र दिनानिमित्त महिनाभर मोफत नेत्रतपासणी; स्वस्तिक हॉस्पिटलचा उपक्रम; उत्स्फूर्त प्रतिसाद

अहिल्यानगर  : महाराष्ट्र दिनानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवत स्वस्तिक हॉस्पिटलतर्फे संपूर्ण मे महिन्यात मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आ

लेखक डॉ. राजेश दिवटे यांच्या ‘परिसस्पर्श’ ग्रंथाचे प्रकाशन; अहिल्यानगरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
जायकासह महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्र बळकट करण्यासाठी नवे पाऊल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; जायकाकडून 3 हजार 708 कोटींची वित्तीय सहाय्यता
काँग्रेसच्या नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील

अहिल्यानगर  : महाराष्ट्र दिनानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवत स्वस्तिक हॉस्पिटलतर्फे संपूर्ण मे महिन्यात मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १ मे ते ३१ मे दरम्यान सुरू असलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांना डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

या शिबिरामध्ये दृष्टीदोष तपासणी, डोळ्यांचे आजार ओळखणे तसेच आवश्यक वैद्यकीय सल्ला पूर्णपणे मोफत दिला जात आहे. वाढता स्क्रीन टाइम आणि बदलती जीवनशैली यामुळे डोळ्यांवर होणारा ताण लक्षात घेता नियमित तपासणीचे महत्त्व अधोरेखित होत असून, या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटातील रुग्ण या शिबिराचा लाभ घेत आहेत.

 सामाजिक बांधिलकी जपत स्वस्तिक हॉस्पिटलतर्फे (कॉटेज कॉर्नरजवळ, अहिल्यानगर) अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्यसेवा पुरवली जात आहे. “परवडणाऱ्या दरात प्रीमियम सेवा” या संकल्पनेनुसार रुग्णालयात अनुभवी नेत्रतज्ज्ञांची टीम कार्यरत असून, अचूक निदान व प्रभावी उपचार दिले जातात. अधिक माहितीसाठी ७४४७५५९९७७ या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कॅटरॅक्ट, रेटिना, कॉर्निया, ग्लॉकोमा तसेच लेसिकसह विविध उपचारांची सुविधा येथे उपलब्ध आहे.

COMMENTS