Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चिंचोली काळदात येथे भाजपचे प्रशिक्षण शिबीर

कर्जत : पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत कर्जत मंडलाच्या चिंचोली काळदात येथे आयोजित दोन दिवसीय निवासी कार्यशाळेत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये सहभागी होत त्यांचा उत्साह दुणावला. भारतीय जनता पक्षाच्या बूथ अध्यक्ष, प्रमुख कार्यकर्ते व लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांना सक्षम व जबाबदार कार्यकर्ता म्हणून घडविण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, बूथ व्यवस्थापन आणि संघटनात्मक बांधणी या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.  विशेष म्हणजे, प्रा. राम शिंदे यांनी शासकीय लवाजमा बाजूला ठेवत दोन दिवस कार्यकर्त्यांसमवेत मुक्काम केला. त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बसून प्रशिक्षणात सहभाग घेतल्याने उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले, अशी माहिती पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे व मंडल अध्यक्ष अनिल गदादे यांनी दिली. या कार्यशाळेत एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला “बूथ व्यवस्थापन” व “मन की बात” या विषयांवर सादरीकरण करण्याची संधी देण्यात आली. त्या वेळी सभापती शिंदे कार्यकर्त्यांमध्ये बसून मार्गदर्शन ऐकत असल्याने हा प्रसंग विशेष ठरला. भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त मिळालेली ही संधी कार्यकर्त्यांसाठी अभिमानाची बाब ठरली.  प्रशिक्षण महाअभियानाचे मार्गदर्शन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. अभियानाचे महाराष्ट्र संयोजक राजेश पांडे, सहसंयोजक व प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, प्रदीप फस्कर तसेच अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर पार पडले.  “पार्टी विथ डिफरन्स” या संकल्पनेला साजेसा अनुभव या कार्यशाळेत मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांमधील संवाद वाढविणारे असे उपक्रम पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाचे ठरत असल्याचे सचिन पोटरे यांनी सांगितले. 

राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांचा विजय; १.१२ लाख मताधिक्क्याने विरोधकांचा धुव्वा; सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिलेंचा 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय
अहिल्यानगर जिल्हा शिवसेनेची कार्यकारणी बरखास्त मंत्री उदय सामंत यांची कार्यवाही ; प्रभारी म्हणून जिल्हाप्रमुखांकडे जबाबदारी 

कर्जत : पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत कर्जत मंडलाच्या चिंचोली काळदात येथे आयोजित दोन दिवसीय निवासी कार्यशाळेत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये सहभागी होत त्यांचा उत्साह दुणावला.

भारतीय जनता पक्षाच्या बूथ अध्यक्ष, प्रमुख कार्यकर्ते व लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांना सक्षम व जबाबदार कार्यकर्ता म्हणून घडविण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, बूथ व्यवस्थापन आणि संघटनात्मक बांधणी या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

 विशेष म्हणजे, प्रा. राम शिंदे यांनी शासकीय लवाजमा बाजूला ठेवत दोन दिवस कार्यकर्त्यांसमवेत मुक्काम केला. त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बसून प्रशिक्षणात सहभाग घेतल्याने उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले, अशी माहिती पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे व मंडल अध्यक्ष अनिल गदादे यांनी दिली.

या कार्यशाळेत एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला “बूथ व्यवस्थापन” व “मन की बात” या विषयांवर सादरीकरण करण्याची संधी देण्यात आली. त्या वेळी सभापती शिंदे कार्यकर्त्यांमध्ये बसून मार्गदर्शन ऐकत असल्याने हा प्रसंग विशेष ठरला. भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त मिळालेली ही संधी कार्यकर्त्यांसाठी अभिमानाची बाब ठरली.

 प्रशिक्षण महाअभियानाचे मार्गदर्शन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. अभियानाचे महाराष्ट्र संयोजक राजेश पांडे, सहसंयोजक व प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, प्रदीप फस्कर तसेच अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर पार पडले.

 “पार्टी विथ डिफरन्स” या संकल्पनेला साजेसा अनुभव या कार्यशाळेत मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांमधील संवाद वाढविणारे असे उपक्रम पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाचे ठरत असल्याचे सचिन पोटरे यांनी सांगितले. 

COMMENTS