Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टाकळी येथे पीक कापणी प्रयोग उत्साहात

कोपरगाव शहर  : तालुक्यातील टाकळी येथील अंबादास कारभारी देवकर यांच्या शेती मध्ये तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे व कृषी अधिकारी सचिन कोष्टी यांच्य

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ड्रोन कार्यशाळेचास उत्स्फूर्त प्रतिसाद
ओबीसी समाजासाठी सदैव लढणार : मंत्री भुजबळ  
ब्राह्मणवाडा येथील ब्रिटिशकालीन विश्रामागृह वणव्यात खाक

कोपरगाव शहर  : तालुक्यातील टाकळी येथील अंबादास कारभारी देवकर यांच्या शेती मध्ये तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे व कृषी अधिकारी सचिन कोष्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक प्रबंधक भारतीय विमा कंपनी मुंबई पराग दातीर, विभागीय व्यवस्थापक, नाशिक  सोमेश देशमुख, पिक विमा प्रतिनिधी कोपरगाव तालुका अमोल रानोडे यांच्या उपस्थितीत कांदा पिकाची पीक कापणी प्रयोग यशस्वीरीत्या पार पडला. सदर प्रयोगात संबंधित पिकाचे उत्पादन मोजण्यासाठी नमुना क्षेत्रात शास्त्रीय पद्धतीने कापणी करण्यात आली.
या प्रयोगावेळी  टाकळी येथील ग्रामपंचायत अधिकारी नम अहिरे, माजी सभापती  सुनिल देवकर, शेतकरी  परसराम देवकर, ग्रामपंचायत कर्मचारी अमोल भुजबळ,  भागवत देवकर, गोरख डिबरे आदी उपस्थित होते. संबंधित पिकाचे उत्पादन, क्षेत्रफळ व इतर माहिती नोंदविण्यात आली. या प्रयोगामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष उत्पादनाचा अंदाज मिळण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी सुरळीतपणे पार पडली असून उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. विमा कंपनीमार्फत अशा प्रकारचे प्रयोग शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे सांगण्यात आले.

COMMENTS