Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिरपूर तालुक्यात संताप! ग्रामदेवतेच्या रथाला लावली आग; सार्वजनिक मालमत्तेचीही तोडफोड!

https://www.youtube.com/watch?v=fKSR8bRnVI8 धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोराडी गावातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर

कल्याणमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! दुर्गाडी किल्ल्यावर प्रवेशबंदीवरून शिवसैनिक आक्रमक; पोलिसांचे बॅरिकेड्स झुगारून ‘घंटानाद’ आंदोलन!
नागपूरमध्ये मुरुम माफियांचा धुमाकूळ तहसीलदाराला ३ किलोमीटर फरफटत नेत दिला जीवे मारण्याचा प्रयत्न
विधेयक लोकसभेत नामंजूर होवूनही महिला आरक्षण’ 2029 मध्ये लागू होऊ शकते

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोराडी गावातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावातील शांतता आणि एकोपा बिघडवण्याच्या उद्देशाने काही अज्ञात समाजकंटकांनी थेट ग्रामदेवतेच्या पारंपरिक रथालाच आग लावल्याची घटना घडली आहे. एवढंच नाही तर, गावात कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात आलेल्या सार्वजनिक विकासकामांची आणि रस्ते सुशोभीकरणाचीही मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण बोराडी गावात तीव्र संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.

COMMENTS