अतिवृष्टीमुळे नुकसानीचे तीन दिवसात प्रस्ताव करा ; गृहराज्य मंत्र्यांच्या पाटण तालुका प्रशासनाला सूचना

Homeमहाराष्ट्र

अतिवृष्टीमुळे नुकसानीचे तीन दिवसात प्रस्ताव करा ; गृहराज्य मंत्र्यांच्या पाटण तालुका प्रशासनाला सूचना

गेल्या दोन तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्यातातील  डोंगरी भागातील गावांमध्ये अतिवृष्टी  झाली आहे.

शिर्डी येथील क्रांती युवक मंडळाचे अभिनव पद्धतीने गणेश विसर्जन..
पुण्यात पोर्टलवरून ड्रग्ज तस्करी; शिरूरमध्ये तिघे जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त
Sanjay Raut : राज्यपाल इतका अभ्यास बरा नाही, त्यांच ओझं झेपलं पाहिजे | LOKNews24

सातारा / प्रतिनिधी : गेल्या दोन तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्यातातील  डोंगरी भागातील गावांमध्ये अतिवृष्टी  झाली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे येत्या तीन दिवसांत पंचनामे करुन प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांमार्फत शासनास सादर करा, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.

पाटण तालुक्यातील अतीवृष्टीमुळे बाधित झालेल्या विविध गावांची पहाणी गृह राज्यमंत्री देसई यांनी केली. यावेळी त्यांनी सुचना केल्या. पाहणी प्रसंगी पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार योगेश्‍वर टोणपे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दशरथ काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचे, रस्ते, पूल व शेतीचे नुकसान झाले आहे. काही शेतकर्‍यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्याचे पंचनामे कृषी विभाग, महसुल विभाग व ग्रामसेवक यांनी तात्काळ पंचनामे करुन एकत्रित प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांमार्फत शासनास सादर करावा. प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीत शासनाच्या निदर्शनास आणला जाईल. झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्यासाठी व अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेली दळणवळण व्यवस्था पूर्ववत करणार असल्याचेही प्रयत्न शंभूराज देसाई यांनी पहाणीदरम्यान सांगितले.

COMMENTS