पुणे : शहरातील घोरपडी पेठ येथील पोलिस चौकीजवळ शुक्रवारी भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. या हल्ल्यात ख्वाजाउद्दीन ना
पुणे : शहरातील घोरपडी पेठ येथील पोलिस चौकीजवळ शुक्रवारी भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. या हल्ल्यात ख्वाजाउद्दीन नाजीर शेख उर्फ नुरू शेख हा तरुण जखमी झाला असून त्याच्या पाठीला गोळी लागली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुजल सुनील परदेशी आणि त्याचा एक साथीदार दुचाकीवरून घोरपडी पेठ परिसरात आले. त्यांनी नुरू शेख याच्यावर सलग तीन गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

COMMENTS