ऑक्सिजन अभावी 28 बळी ; चौकशी समिती नियुक्त; मृतांच्या वारसांना दहा लाखांची मदत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऑक्सिजन अभावी 28 बळी ; चौकशी समिती नियुक्त; मृतांच्या वारसांना दहा लाखांची मदत

नाशिकमध्ये महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाली आहे.

जेष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी काळाच्या पडद्याआड
साहित्यिकांचे राजीनामा, पुरस्कार वापसी सुरूच
सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याने संपविले आयुष्य | LOKNews24

नाशिक/प्रतिनिधी : नाशिकमध्ये महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने 22 रुग्णांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. यात 11 महिला आणि 11 पुरुषांचा समावेश आहे. मृतांच्या वारसांना राज्य सरकार आणि महानगरपालिकेने प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी तिघांची चौैकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. 

नाशिक शहरात महापालिकेचे झाकीर हुसेन रुग्णालय आहे. हे रुग्णालय कोविड रुग्णांसाठी जीवदान ठरत आहे; मात्र ऑक्सिजन पुरवठा आणि कर्मचार्‍यांच्या अभावामुळे हे रुग्णालय नेहमी चर्चेत राहिले आहे. नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. ऑक्सिजनच्या दाबामुळे नोझल तुटले. त्यामुळे ही ऑक्सिजन गळती झाली. ऑक्सिजनची गळती झाल्यानंतर रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली. या रुग्णालयातील ऑक्सिजन टँकला गळती लागल्याने हजारो लीटर ऑक्सिजन वाया गेला. यावेळी अनेक कोव्हिड रुग्णांवर उपचार सुरू होते. यातील दीडशे लोक व्हेंटिलेटरवर होते. रुग्णालयात अचानक ऑक्सिजन गळती झाल्याने रुग्णांना होणारा पुरवठा बंद झाला. त्यामुळे व्हेंटिलेटवर असलेल्या रुग्णांपैकी 22 जणांचा तडफडून मृत्यू झाला. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे तातडीने नाशिकला दाखल झाले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णालयात 157 रुग्ण दाखल आहेत. 61 रुग्ण हे चिंताजनक होते, म्हणजे त्यांना व्हेटिलेटर्स आणि ऑक्सिजनची गरज होती. त्यात लिक्विड स्टोरेज टँकमधून गळती झाली. उच्च दाबामुळे वेल्डिंग करण अवघड असते; पण सुदैवाने तिथे एजन्सीचे लोक असल्याने पुढची घटना टळली; पण ही घटना दुर्दैवी आहे. याबाबत आयुक्तांशी बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनाही घटनेची सर्व माहिती दिली आहे. तांत्रिक कारणामुळे ही घटना घडली आहे, याची सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. या घटनेची चौकशी करण्यासाठी तिघांची समिती नेमण्यात आली आहे. त्यात भारतीय प्रशासकीय सेवेतील एक अधिकारी, एक अभियंता आणि एका डॉक्टरांचा समावेश आहे.  नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या वेळी ऑक्सिजन टाकीतील गळती रोखण्यासाठी अथक प्रयत्न सुरू होते. जवळपास एक ते दीड तासानंतर ऑक्सिजन गळती रोखण्यास अग्निशमन दलाला यश आले. या घटनेमुळे रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. या हलगर्जीपणामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिक महापालिकेनेही प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली. 

मुख्यमंत्री निशब्द!

दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईल. या दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाही. या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये.

-उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

आई फडफड करून मेली!

माझ्या आईला 2 दिवस वेटिंगवर ठेवलं, हे काय हॉटेल आहे का? माझी मम्मी बरी झाली होती. अर्धा तास पहिले ऑक्सिजन संपला, फडफड करून ती मेली, कोणी आलं नाही. वार्डमध्ये जेवढे पेशंट होते तेवढे सगळे मेले.

-एक अभागी मुलगी

दोषींना शिक्षा करणारच

या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना निश्‍चित शिक्षा केली जाईल. यापुढे अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये, याची काळजी घेतानाच, राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत सुरू राहील, याची दक्षता घ्या.

अजित पवार, उपमुख्यमंत्री

COMMENTS