Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सामनगावच्या सरपंच-उपसरपंचांविरोधातील ‘अविश्वास’ मंजूर

शेवगाव : तालुक्यातील सामनगाव ग्रामपंचायतचे सरपंच आदिनाथ रामनाथ कापरे व उपसरपंच प्रमोद सुरेश कांबळे यांच्या विरोधात सदरील ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव नुकताच मंजूर झाला. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३५ नुसार शेवगावचे प्रभारी तहसीलदार निलेश वाघमारे यांनी सामनगाव ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच व उपसरपंच यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलवण्यात आली होती, या बैठकीस कृष्णा सुरेश सातपुते, सुदाम विनायक झाडे, आत्माराम संपत निकम, विमल वसंत कांबळे, सुभद्रा बाबासाहेब काळे, लताबाई नंदूशेठ नजन, संगीता रमेश नजन, शीला बाळासाहेब म्हस्के इत्यादी ग्रामपंचायत सदस्य यावेळी हजर होते, माजी सरपंच आदिनाथ कापरे, माजी उपसरपंच प्रमोद कांबळे यावेळी अनुपस्थित राहिले, सदरील झालेल्या निर्णय प्रक्रियेमध्ये शेवगावचे प्रभारी तहसीलदार निलेश वाघमारे यांनी सरपंच व उपसरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर मंजूर झाल्याचे जाहीर केले. याप्रसंगी ग्रामपंचायतीच्या अधिकारी पंडित भाऊसाहेब यांनी सभेचे इतिवृत्त लिहिले. यावेळी भातकुडगाव चे महसूल मंडळ अधिकारी मंडलिक रावसाहेब, कामगार तलाठी नांगरे भाऊसाहेब उपस्थित होते.

सीना नदीपात्रात वाळू चोरी विरोधात कारवाई; कर्जत पोलिसांची कामगिरी ; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
बसवेश्वरांच्या विचारांनी समाजात समता रुजवली : आ.मोनिका राजळे
स्वामी चरित्र पारायण सोहळ्यासाठी बसणार 25 हजार भाविक

शेवगाव : तालुक्यातील सामनगाव ग्रामपंचायतचे सरपंच आदिनाथ रामनाथ कापरे व उपसरपंच प्रमोद सुरेश कांबळे यांच्या विरोधात सदरील ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव नुकताच मंजूर झाला.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३५ नुसार शेवगावचे प्रभारी तहसीलदार निलेश वाघमारे यांनी सामनगाव ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच व उपसरपंच यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलवण्यात आली होती, या बैठकीस कृष्णा सुरेश सातपुते, सुदाम विनायक झाडे, आत्माराम संपत निकम, विमल वसंत कांबळे, सुभद्रा बाबासाहेब काळे, लताबाई नंदूशेठ नजन, संगीता रमेश नजन, शीला बाळासाहेब म्हस्के इत्यादी ग्रामपंचायत सदस्य यावेळी हजर होते, माजी सरपंच आदिनाथ कापरे, माजी उपसरपंच प्रमोद कांबळे यावेळी अनुपस्थित राहिले,

सदरील झालेल्या निर्णय प्रक्रियेमध्ये शेवगावचे प्रभारी तहसीलदार निलेश वाघमारे यांनी सरपंच व उपसरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर मंजूर झाल्याचे जाहीर केले. याप्रसंगी ग्रामपंचायतीच्या अधिकारी पंडित भाऊसाहेब यांनी सभेचे इतिवृत्त लिहिले. यावेळी भातकुडगाव चे महसूल मंडळ अधिकारी मंडलिक रावसाहेब, कामगार तलाठी नांगरे भाऊसाहेब उपस्थित होते.

COMMENTS