Homeताज्या बातम्यादेश

उमेदवारांची यादी जाहीर होताच कर्नाटक भाजपमध्ये बंडाळी

माजी उपमुख्यमंत्र्यांसह बाराशेहून अधिक कार्यकर्त्यांनी सोडला पक्ष

बंगळूरू/वृत्तसंस्था ः कर्नाटकमध्ये येदीयुरप्पा पायउतार झाल्यापासून भाजपला उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक जाहीर झाल्य

तारेचा शॉक लागून बैलजोडीचा दुर्दैवी मृत्यू
अंबादास दानवे यांनी केज तालुक्यात नुकसान झालेल्या फळबाग व पिकाची केली पाहणी
मी मुख्यमंत्री व्हावे ही कार्यकर्त्यांची इच्छा

बंगळूरू/वृत्तसंस्था ः कर्नाटकमध्ये येदीयुरप्पा पायउतार झाल्यापासून भाजपला उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपकडून सुक्ष्म नियोजन करण्यात येत असले तरी, पक्षातील नेत्यांची नाराजी उफाळून येतांना दिसून येत आहे. कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपकडून 189 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यानंतर पक्षातील नाराजीनाट्याने वेग घेतला असून, अनेक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपच्या पहिल्या यादीत 189 उमेदवारांच्या यादीमध्ये 52 नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे.  मात्र नाराजी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी बंडखोरीचे हत्यार उपसले आहे. कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने बंडखोरी करत पक्ष सोडल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. तसेच कर्नाटकचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या नाराजीची बातमीही समोर आली आहे. कारण त्यांनाही पक्षाने उमेदवारी दिली नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्यासाठी शेट्टर दिल्लीत पोहोचले आहेत. कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनीही भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. 10 मे रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीटाची अपेक्षा होती. मात्र, पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही.

भाजपने बेळगावी जिल्ह्यातील अथणी येथून विद्यमान आमदार महेश कुमथल्ली यांना तिकीट दिले आहे.  कुमथल्ली हे काँग्रेस नेत्यांपैकी एक होते ज्यांनी पक्षांतर केले आणि तत्कालीन काँग्रेस-जेएस(एस) युतीचे सरकार पाडले आणि 2019 मध्ये बीएस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार स्थापन केले. आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राणेबेन्नूरमधून तिकीट न मिळाल्याने माजी मंत्री आर शंकर यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. शंकर यांनी बुधवारी विधानसभा अध्यक्ष बसवराज होराट्टी यांच्याकडे राजीनामा दिला होता. राणेबेन्नूरमधून ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. भाजपने या जागेवरून आमदार अरुण कुमार यांना आधीच तिकीट जाहीर केले आहे. एनआर रमेश यांना आगामी निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आल्यानंतर 1200 हून अधिक भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला आहे. एनआर रमेश यांना तिकीट न दिल्याने पक्षाविरोधात नाराजी व्यक्त करत 1200 हून अधिक समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे प्राथमिक सदस्यत्व सोडले. एनआर रमेश यांना बेंगळुरूमधील जयनगर मतदारसंघातून तिकिट मिळण्याची अपेक्षा होती. मात्र पक्षाची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर भाजप बॅकफूटवर जातांना दिसून येत आहे.

माजी मुख्यमंत्री अपक्ष लढण्याच्या तयारीत – कर्नाटकात भाजपने अनेक बड्या नेत्यांना नाराज केल्यानंतर या नेत्यांनी पक्षांतर किंवा अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते जगदीश शेट्टर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उतरणार असल्याचे दिसत आहे. त्यांना भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी न लढण्यास सांगितले होते. मात्र शेट्टर यांना पक्षाचा निर्णय मान्य नाही. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना 10 मे रोजी होणारी विधानसभा निवडणूक लढवू नये असे सांगितले आहे. मात्र त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.

COMMENTS