Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बंधार्‍यावरील लोखंडी दरवाजांची चोरी

कर्जत : कर्जत तालुक्यातील राशीन येथील वाघजाई, करमनवाडी मोहिते वस्ती, सरोदे वस्ती, जाधव वस्ती येथील बंधार्‍यावर शासनाच्या वतीने लाखो रुपये खर्चून

कर्मचारी संपावर.. तहसीलदार मात्र एकट्या कामावर; पारनेरमध्ये आ. लंके-देवरे वाद दिवसेंदिवस चिघळण्याच्या मार्गावर
कोल्हे साखर कारखान्यातील इथेनॉलचा ऑईल कंपन्यांना पुरवठा
नीरज चोप्राचं भालाफेकमध्ये ऐतिहासिक ‘सुवर्ण’ l DAINIK LOKMNTHAN

कर्जत : कर्जत तालुक्यातील राशीन येथील वाघजाई, करमनवाडी मोहिते वस्ती, सरोदे वस्ती, जाधव वस्ती येथील बंधार्‍यावर शासनाच्या वतीने लाखो रुपये खर्चून शेतकर्‍यांच्या जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र गेल्या काही दिवसात शासन यंत्रणेच्या वतीने काढून ठेवण्यात आलेल्या या बंधार्‍याचे दरवाजे चोरीला गेल्याचा प्रकार उघड झाला आहे. या बंधार्‍यांमुळे मोठ्या प्रमाणावर शेती क्षेत्र ओलिताखाली आलेले आहे. त्याचा अनेक शेतकर्‍यांना फायदा होत आहे. परंतु सध्या बंधारे कोरडेठाक पडले आहेत. शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून बंधार्‍याला बसविलेले दरवाजे बाजूला काढून ठेवले आहेत. अज्ञात चोरट्यांनी हे दरवाजे चोरून नेण्याचा सपाटा लावला आहे. ही घटना मोहिते वस्ती व परिसरातील शेतकर्‍यांच्या लक्षात आल्याने पुढील चोरी रोखण्यात आली. बंधार्‍याचे दरवाजे चोरणार्‍या अज्ञात चोट्यांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे. परिसरातील बंधार्‍यावरील, विहिरीवरील, शेततळ्यावरील विद्युत पंप, केबल चोरीचे प्रमाण वाढले आहे. पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन अज्ञात चोरट्यांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

COMMENTS