Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालयाचे चौघे राज्यात प्रथम; बारावीतील नऊ विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांहून अधिक गुण

कर्जत : रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाने यंदाही आपल्या उज्ज्वल परंपरेला साजेशी कामगिरी करत विविध परीक्षांमध्ये तालुका आणि राज्य स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालांमध्ये विद्यालयाचे चार विद्यार्थी राज्यात प्रथम येत अभिमानास्पद यश मिळवले आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षेत विद्यालयातील तब्बल नऊ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले असून, तालुक्यातील इतर कोणत्याही शाळेला इतक्या मोठ्या संख्येने उच्च गुण मिळवणारे विद्यार्थी घडवता आले नाहीत. यामध्ये कदम नम्रता बापू (८३.६७), गायकवाड सृष्टी शेखर (८३.१७), थोरात गौरी रवींद्र (८२.६७), शिंदे मयुरी रावसाहेब (८२.६७), गायकवाड वृषाली काकासाहेब (८१.१७), काळे साक्षी संतोष (८०.८३), बुवा पियुष सुधीर (८०.१७), जगताप श्रद्धा ताराचंद (८०.१७) आणि शेळके साक्षी नामदेव (८०.१७) यांचा समावेश आहे. यामध्ये गायकवाड सृष्टी शेखर हिने गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कोकाटे कृष्णा विनोद आणि शेळके साक्षी नामदेव यांनी ॲग्री विषयात प्रत्येकी १०० गुण मिळवत राज्यात अव्वल स्थान मिळवले. इयत्ता पाचवीतील विद्यार्थी राजवीर महेश आरडे याने नवोदय परीक्षेत १०० पैकी १०० गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला. त्यामुळे विद्यालयाचे एकूण चार विद्यार्थी राज्यात प्रथम ठरले आहेत. याशिवाय, एनएमएमएस परीक्षेत इयत्ता आठवीच्या पाच विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवत तालुक्यात सर्वाधिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी असण्याचा मान विद्यालयाने मिळवला आहे. यात निकम वेदांत तानाजी (१४४), दवणे संग्राम आजिनाथ (१४१), उदमले संग्राम अशोक (१४०), गदादे संस्कार उत्तम (१३५) आणि पानगे सार्थक भाऊराव (१२२) यांचा समावेश आहे. तसेच, सैनिक स्कूल सातारा येथे इयत्ता पाचवीतील राजवीर महेश आरडे आणि बचाटे जितेश शंकर यांची निवड झाली असून, नवोदय विद्यालयासाठीही राजवीर आरडे याची निवड झाली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मुख्याध्यापक राजकुमार चौरे, उपमुख्याध्यापक नवनाथ सोनवणे आणि पर्यवेक्षक अरुणकुमार पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली अभिनंदन होत आहे. आमदार रोहित पवार, राजेंद्र फाळके, अंबादास पिसाळ, बापूराव धांडे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ व पालकांनीही या यशाबद्दल कौतुक व्यक्त केले आहे.

डॉ. हेडगेवार शिक्षणशास्त्र महाविद्यालयात; वार्षिक पारितोषिक व दीक्षांत समारंभ उत्साहात
अहिल्यानगर जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा वाढला; श्रीरामपूर, शिर्डी कोपरगावमध्ये तापमानाने ओलांडली चाळीशी!
ग्रामीण रुग्णालयातील अत्याधुनिक विनामूल्य उपचाराबाबत जनजागृती करा-आ.सुरेश धस

कर्जत : रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाने यंदाही आपल्या उज्ज्वल परंपरेला साजेशी कामगिरी करत विविध परीक्षांमध्ये तालुका आणि राज्य स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालांमध्ये विद्यालयाचे चार विद्यार्थी राज्यात प्रथम येत अभिमानास्पद यश मिळवले आहे.

इयत्ता बारावीच्या परीक्षेत विद्यालयातील तब्बल नऊ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले असून, तालुक्यातील इतर कोणत्याही शाळेला इतक्या मोठ्या संख्येने उच्च गुण मिळवणारे विद्यार्थी घडवता आले नाहीत. यामध्ये कदम नम्रता बापू (८३.६७), गायकवाड सृष्टी शेखर (८३.१७), थोरात गौरी रवींद्र (८२.६७), शिंदे मयुरी रावसाहेब (८२.६७), गायकवाड वृषाली काकासाहेब (८१.१७), काळे साक्षी संतोष (८०.८३), बुवा पियुष सुधीर (८०.१७), जगताप श्रद्धा ताराचंद (८०.१७) आणि शेळके साक्षी नामदेव (८०.१७) यांचा समावेश आहे.

यामध्ये गायकवाड सृष्टी शेखर हिने गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कोकाटे कृष्णा विनोद आणि शेळके साक्षी नामदेव यांनी ॲग्री विषयात प्रत्येकी १०० गुण मिळवत राज्यात अव्वल स्थान मिळवले.

इयत्ता पाचवीतील विद्यार्थी राजवीर महेश आरडे याने नवोदय परीक्षेत १०० पैकी १०० गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला. त्यामुळे विद्यालयाचे एकूण चार विद्यार्थी राज्यात प्रथम ठरले आहेत.

याशिवाय, एनएमएमएस परीक्षेत इयत्ता आठवीच्या पाच विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवत तालुक्यात सर्वाधिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी असण्याचा मान विद्यालयाने मिळवला आहे. यात निकम वेदांत तानाजी (१४४), दवणे संग्राम आजिनाथ (१४१), उदमले संग्राम अशोक (१४०), गदादे संस्कार उत्तम (१३५) आणि पानगे सार्थक भाऊराव (१२२) यांचा समावेश आहे.

तसेच, सैनिक स्कूल सातारा येथे इयत्ता पाचवीतील राजवीर महेश आरडे आणि बचाटे जितेश शंकर यांची निवड झाली असून, नवोदय विद्यालयासाठीही राजवीर आरडे याची निवड झाली आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मुख्याध्यापक राजकुमार चौरे, उपमुख्याध्यापक नवनाथ सोनवणे आणि पर्यवेक्षक अरुणकुमार पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली अभिनंदन होत आहे. आमदार रोहित पवार, राजेंद्र फाळके, अंबादास पिसाळ, बापूराव धांडे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ व पालकांनीही या यशाबद्दल कौतुक व्यक्त केले आहे.

COMMENTS