Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऑपरेशन क्रॅकडाउन : नांदेड पोलिसांची विशेष मोहीम

नांदेड : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी नांदेड जिल्हा पोलिसांनी ऑपरेशन क्रॅकडाउन ही विशेष मोहीम हाती घेतली असून, ती दि. 30 ए

गोरेगाव ‘नेस्को’ ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट; बॉलिवूड कनेक्शन उघड, सीसीटीव्हीमुळे खळबळ!
मणिपूरमध्ये शस्त्र 1800 किलो अफूसह दोघे जेरबंद
सिरसदेवी येथे एलसीबीचा छापा; 8 किलो गांजासह एकाला अटक
Nanded Range Police

नांदेड : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी नांदेड जिल्हा पोलिसांनी ऑपरेशन क्रॅकडाउन ही विशेष मोहीम हाती घेतली असून, ती दि. 30 एप्रिल 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत तीव्र स्वरूपात राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेत अवैध मटका व जुगार, अंमली पदार्थ (छऊझड) तसेच अवैध शस्त्रे (धारदार व अग्निशस्त्रे) यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. यापूर्वी पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात विशेष पथकाद्वारे मोहीम राबवून उल्लेखनीय कारवाई केली होती. तसेच अवैध अग्निशस्त्रांविरोधात कारवाई करत एका महिन्यात 9 देशी पिस्तूल व 70 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान 70 पेक्षा अधिक -ीाी -लीं अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर आता अधिक व्यापक व लक्ष केंद्रीत मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध व्यवसायांविरोधात कठोर व प्रभावी कारवाईचे आदेश देण्यात आले असून, त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे. मोहिमेअंतर्गत अवैध धंद्यांवर थेट कारवाई करणे, संबंधित गुन्ह्यांमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेणे, त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करणे तसेच संपूर्ण सप्लाय चेन मोडीत काढण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच सराईत गुन्हेगारांविरुद्ध चझऊ-, चउजउ- व इछड कलम 111, 112 अंतर्गत कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे नियोजन आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यांना भेट देऊन कारवाईचा नियमित आढावा घेणार असून, कारवाई प्रभावी व सातत्यपूर्ण राहील याची दक्षता घेणार आहेत. या विशेष मोहिमेत पुढील बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे: अवैध मटका / जुगार अंमली पदार्थांविरोधातील कारवाई (छऊझड)
अवैध शस्त्रांवरील कारवाई (-ीाी -लीं)
नागरिकांनी मटका, अंमली पदार्थ विक्री/सेवन किंवा बेकायदेशीर शस्त्रांबाबत कोणतीही माहिती असल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा 112 हेल्पलाईनवर माहिती देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS