Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रशासकीय अनास्था! धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाची दुरवस्था; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाटमहादेव गंगणे पाटील यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

शहराच्या वैभवात भर घालणार्‍या आणि करोडोंचे प्रेरणास्थान असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाची सध्या मोठी दुरवस्था झाली आहे. प्

पिंपरनईचा गावतलाव कोरडा; ग्रामस्थांवर खड्डे खोदून सांडपाणी वापरण्याची वेळवेळीच पाणीउपसा थांबवला असता तर ही वेळ आली नसती – सुनील भोसले
रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला शेतकरी हक्क मोर्चाचा पाठिंबाफसव्या कर्जमाफी जीआरची गावोगावी होळी करणार-राजेंद्र आमटे
तौहिद खान हत्याकांडामुळे परळीत संताप; व्हायरल ऑडिओची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणीअल्पसंख्यांक संरक्षण संघर्ष समितीचे पोलीस अधीक्षक कार्यालयास निवेदन



शहराच्या वैभवात भर घालणार्‍या आणि करोडोंचे प्रेरणास्थान असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाची सध्या मोठी दुरवस्था झाली आहे. प्रशासनाच्या या उदासिनतेमुळे स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली असून, स्मारकाची तातडीने डागडुजी आणि स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्य महादेव गंगणे पाटील यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
परळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा आणि परिसर सध्या देखभालीअभावी अतिशय दयनीय अवस्थेत आहे. स्मारकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात सर्वत्र कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पुतळ्याच्या चौथर्‍याची पडझड झाली असून, रात्रीच्या वेळी या ठिकाणी पुरेशी दिवाबत्ती नसल्याने परिसरात अंधार असतो. एकीकडे महापुरुषांच्या नावाने राजकारण केले जात असताना, दुसरीकडे त्यांच्या स्मारकांकडे होणारे हे दुर्लक्ष प्रशासनाचे अपयश असल्याची टीका होत आहे. पुतळा जेव्हा बसवला गेला तेव्हा सत्ताधारी आणि मा. नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या सह त्यांच्या सहकार्‍यांनी एक महिन्यात सुशोभीकरण करू अशा घोषणा करत प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला होता पण प्रत्यक्षात परिस्थिती पूर्ण उलटी असल्याची प्रतिक्रिया महादेव गंगणे पाटील यांनी दिली आहे स्थानिक शिवप्रेमींनी अनेकवेळा नगर पालिकेकडे या संदर्भात तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. स्वराज्यरक्षकांचे स्मारक ही आमची अस्मिता आहे, त्याची अशी अवस्था पाहणे क्लेशदायक आहे, अशा भावना शिवप्रेमींसह महादेव गंगणे पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत. या स्मारकाची नियमित स्वच्छता व्हावी, परिसराचे सौंदर्यीकरण करावे आणि सुरक्षेसाठी रक्षक नेमावा, अशा मागण्या नागरिकांनी केल्या आहेत. जर येत्या काही दिवसांत स्मारकाची स्थिती सुधारली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही महादेव गंगणे पाटील यांनी दिला आहे. आता तरी नगर परिषद प्रशासन या गंभीर विषयाकडे लक्ष देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

COMMENTS