Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोरेगाव ‘नेस्को’ ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट; बॉलिवूड कनेक्शन उघड, सीसीटीव्हीमुळे खळबळ!

https://www.youtube.com/watch?v=9YOp4eGwwjM मुंबईतील गोरेगावचे नेस्को ग्राऊंडवर म्युझिक कॉन्सर्टच्या नावाखाली झालेल्या रेव्ह पार्टीत दोन तरु

सिरसदेवी येथे एलसीबीचा छापा; 8 किलो गांजासह एकाला अटक
मिरा-भाईंदरमध्ये ‘झॉम्बी’ ड्रग्जचा सुळसुळाट
दिल्ली विमानतळावर कस्टमची सर्वात मोठी कारवाई! बँकॉकहून आलेला ४८ कोटींचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त!

मुंबईतील गोरेगावचे नेस्को ग्राऊंडवर म्युझिक कॉन्सर्टच्या नावाखाली झालेल्या रेव्ह पार्टीत दोन तरुणांचा मृत्यू झाला होता आणि आता या प्रकरणाचे धागेदोरे थेट बॉलिवूडपर्यंत पोहोचले आहेत!
सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात बॉलिवूडमधील दोन मोठे चेहरे दिसून आले आहेत. या पार्टीत हे दोन कलाकार नेमके काय करत होते? त्यांचा या ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभाग आहे का? याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.
तर दुसरीकडे, या प्रकरणातील मुख्य आरोपी आयुष विकी साहित्य याला पोलादपूर इथं नाकाबंदी दरम्यान अटक करण्यात आली आहे. आयुषनेच पार्टीत ‘एक्सटसी’ नावाचे घातक ड्रग्ज पुरवले होते. शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे की, ड्रग्जचे अतिसेवन आणि मद्यपान यामुळेच त्या दोन तरुणांचा मृत्यू झाला.
११ एप्रिलच्या त्या काळरात्री नेमकं काय घडलं? बॉलिवूडमधील त्या दोन व्यक्तींची नावं समोर येणार का? आणि या प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण? याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS