Homeताज्या बातम्या

रोहित पवारच सरसकट कर्जमाफी मिळवून देऊ शकतात-राजेंद्र आमटेसंभाजीनगर आंदोलनात शेतकरी हक्क मोर्चा सहभागी

सरकारने शेतकर्‍याला कर्जमाफी देण्याचा शब्द दिला असताना सरकारने वारंवार फसवण्याचे काम केले. बच्चू कडू यांनी शेतकरी आंदोलनातून आमदारकी पदरात पाडून

कर्जमाफीच्या अटीशर्ती रद्द कराअकोलेत किसान सभेची निदर्शने
कर्जमाफी लढा हीच पुढील आंदोलनाची दिशा-डॉ.अजित नवले
महागाई, कर्जमाफीवरून अधिवेशन गाजणार !



सरकारने शेतकर्‍याला कर्जमाफी देण्याचा शब्द दिला असताना सरकारने वारंवार फसवण्याचे काम केले. बच्चू कडू यांनी शेतकरी आंदोलनातून आमदारकी पदरात पाडून घेतली परंतु शेतकर्‍याला सरसकट संपूर्ण कर्जमाफी दिली नाही. आ. रोहित पवार हे शेतकर्‍यांसाठी एक आश्वासक चेहरा निर्माण असून तेच सरसकट कर्जमाफी मिळवून देऊ शकतात असा विश्वास संभाजीनगर येथे झालेल्या आंदोलना प्रसंगी शेतकरी हक्क मोर्च्याचे राजेंद्र आमटे यांनी व्यक्त केला.
शेतकर्‍यांना सरकारने फसवी कर्जमाफी दिल्यानंतर आ. रोहित पवार यांनी शेतकर्‍यांसाठी पंढरपूर येथे आंदोलन केले. यानंतर आज संभाजीनगर येथे आंदोलन करत आहेत. आ. रोहित पवार हे शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी मिळवून देऊ शकतात असा विश्वास शेतकर्‍यांच्या मनात निर्माण झालेला आहे. यामुळे रोहित पवारच शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी मिळवून देतील अशी आशा आहे. रोहित पवार बीडमध्ये आले असताना शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने देऊन स्वागत करून शेतकरी हक्क मोर्चा आंदोलनात असल्याबाबतचा पाठिंबाचे पत्र दिले व शेतकरी हक्क मोर्चा शेकडो शेतकर्‍यांसह आंदोलनात सहभागी झाला. यावेळी शेतकरी हक्क मोर्चाचे शेतकरी पुत्र राजेंद्र आमटे, बाळासाहेब मोरे, रामधन जमाले, हनुमान घोडके पाटील, राम कवचट, गोपाल आमटे यांच्या सह शेकडो शेतकरी आंदोलनास उपस्थित होते.

COMMENTS