Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

महिला सक्षमीकरणात महाराजांचे कार्य कौतुकास्पद-तृप्ती देसाई

आनंद दत्तधाम आश्रमाचे मठाधीश, महाराष्ट्र शासनाचे ब्रँड म्बेसेडर, स्वच्छता दूत राष्ट्रसंत द.भ.प. साईनाथ महाराज यांच्या पुढाकाराने पुरुषोत्तम मास (

राशीनमधील सार्वजनिक जागांची विक्री बेकायदेशीरफेरफार रद्द; विकासक, खरेदीदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
द्रौपदी सोळंके यांच्या तेरावीनिमित्त रविवारी कीर्तन सेवेचे आयोजनह.भ.प.वासुदेव बाबा टाकळीकर यांचे कीर्तन
जिल्हा परिषदेतील अतिरिक्त कामकाज नावाखाली चालणारा प्रतिनियुक्तयांचा बाजार उठवला !डॉ. गणेश ढवळे यांच्या पाठपुराव्याला यश


आनंद दत्तधाम आश्रमाचे मठाधीश, महाराष्ट्र शासनाचे ब्रँड म्बेसेडर, स्वच्छता दूत राष्ट्रसंत द.भ.प. साईनाथ महाराज यांच्या पुढाकाराने पुरुषोत्तम मास (अधिक मास) निमित्त दि. 17 मे ते 15 जून 2026 या कालावधीत महिनाभर चुल बंद अन्नदान महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
यावेळी बोलताना तृप्तीताई देसाई यांनी साईनाथ महाराजांच्या सप्तसूत्री उपक्रमांतर्गत राज्यभर सुरू असलेल्या महिला सक्षमीकरणाच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. आज राज्यात भोंदू बाबांचा सुळसुळाट वाढत असताना साईनाथ महाराजांसारखे समाजाभिमुख व लोककल्याणकारी कार्य करणारे युगपुरुष दुर्मिळ आहेत. त्यांच्या कार्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, अशी प्रार्थना त्यांनी भगवंताच्या चरणी केली. कार्यक्रमास सनदी अधिकारी प्रशांत राठोड, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख जोतिबादादा खराटे, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, कैलास गोरठेकर, नाना गोरठेकर, ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान, जवाहरलाल जयस्वाल, नंदकुमार जोशी, विजय आमले, दीपक कान्नव, रुग्ण कल्याण समिती सदस्य अनिल वाघमारे, इलियास बावाणी, आश्रमाचे प्रवक्ते भाऊराव पाटील हडसणीकर, रेणुकादास बेलखोडे, रमेश बद्दीवार, संजय घोगरे, अनिल कोरटकर, पुंडलिक मुंडे, जयकुमार अडकीने आदी मान्यवर उपस्थित होते. हिंदू धर्मात दर तीन वर्षांनी येणार्‍या पुरुषोत्तम मासाला विशेष धार्मिक महत्त्व असून या काळात पूजा, जप-तप, भजन-कीर्तन, अन्नदान आदी धार्मिक कार्य केल्यास विशेष पुण्य लाभते, अशी श्रद्धा आहे. त्यानुसार आनंद दत्तधाम आश्रमातर्फे माहूर शहर व तालुक्यातील नागरिकांसह देशभरातून दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी महिनाभर अन्नदान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी साईनाथ महाराज यांच्या हस्ते श्री रेणुकादेवी मंदिरातील पुजारी व शहरातील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच आश्रमाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी आपल्या मनोगतातून साईनाथ महाराजांच्या सामाजिक व धार्मिक कार्याचे कौतुक केले. मार्गदर्शन करताना साईनाथ महाराज यांनी पुरुषोत्तम मासाचे आध्यात्मिक महत्त्व विशद करत, महिनाभर चालणार्‍या अन्नदान महाप्रसादाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.कार्यक्रमादरम्यान तृप्तीताई देसाई यांची भेट घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आ.भा. शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष शेषराव पाटील यांनी केले. चुल बंद अन्नदान महाप्रसाद कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

COMMENTS