Homeताज्या बातम्या

स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त आ.पंडित यांच्या पुढाकारातून गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजनरक्तदान, रेशीम कार्यशाळा, मोफत कृत्रिम अवयव शिबीर, व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन‘अजितदादा प्रेमींनी’ जनसेवा सप्ताहातील कार्यक्रमास उपस्थित रहावे – आ. विजयसिंह पंडित

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गेवराई शहरात जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबीर, दि

सांगवीच्या वीजप्रश्नांसाठी नगरसेविका मीनल पाटील यांचा पाठपुरावा; पालकमंत्र्यांकडून तातडीच्या कारवाईचे आदेश
नारवट वन पर्यटनस्थळी कथित वीजचोरीचा गंभीर आरोप; महावितरणच्या दुर्लक्षामुळे शासनाला लाखोंचा फटका?अवैध वीजवापर, उघड्या विद्युत तारा आणि विकासनिधीच्या खर्चावरही प्रश्नचिन्ह; सखोल चौकशीची मागणी
महाराष्ट्रातून स्वच्छ ऊर्जेला नवे बळअणुऊर्जा क्षेत्रात साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक : मुख्यमंत्री फडणवीस



महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गेवराई शहरात जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबीर, दिव्यांगांना अनुदान मंजुरीपत्र वाटप, रेशीम शेती कार्यशाळा, कृषी क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान, मोफत कृत्रिम हात व पाय शिबीर, सुप्रसिध्द व्याख्याते संजय आवटे यांचे व्याख्यान यांसह विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आल्याची माहिती आ. विजयसिंह पंडित यांनी दिली आहे. गरजूंनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा आणि ‘स्व. अजितदादा प्रेमी’ नागरीकांनी जनसेवा सप्ताहातील कार्यक्रमांना बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आ. विजयसिंह पंडित यांनी केले आहे.
राज्यशासनाने स्व. अजितदादा पवार यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याचे निर्देशित करून राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तिंच्या अधिकृत जयंती कार्यक्रमात त्यांचा समावेश करून दादांच्या कार्याचा गौरव केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही राज्यभर जनसेवा सप्ताह आयोजित करण्याचे आवाहन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई विधानसभा मतदार संघाचे आ. विजयसिंह पंडित यांनी जनसप्ताहाच्या निमित्ताने विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांना बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ. विजयसिंह पंडित यांनी केले आहे. गेवराई विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते जनसेवा सप्ताहाच्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. बुधवार, दि.22 जुलै रोजी सकाळी 10 वाजता शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, गेवराई येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून शिबीराचा शुभारंभ बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे आणि शेख मुजीब यांच्या शुभहस्ते होणार आहे. गुरुवार, दि.23 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गोदावरी सभागृह र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे दिव्यांगांना अनुदान मंजुरीपत्र वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी कविता जाधव, शुभम पवार, तहसिलदार संजय सोनवणे उपस्थित राहणार आहेत. शुक्रवार, दि.24 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गोदावरी सभागृह, र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे रेशीम शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या कार्यशाळेत रेशीम संशोधन केंद्र, परभणीचे प्रभारी अधिकारी डॉ.चंद्रकांत लटपटे मार्गदर्शन करणार असून सरपंच तथा रेशीमरत्न शेतकरी कालिदास नवले आणि तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शुक्रवार, दि.24 जुलै रोजी दुपारी 3 वाजता सुप्रसिध्द व्याख्याते तथा लोकमतचे संपादक संजय आवटे यांचे व्याख्यान होणार आहे. रविवार, दि.26 जुलै रोजी शारदा प्रतिष्ठान आणि साधू वासवानी मिशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम हात व पाय शिबीराचे आयोजन करण्यात आले असून शिबीरात अद्यावत टेक्नॉलॉजीद्वारे फायबरपासून निर्मित अत्यंत हलके व मजबुत कृत्रिम अवयवांचे मोफत वाटप होणार आहे. या सर्व कार्यक्रमांची माहिती आ. विजयसिंह पंडित यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गेवराई विधानसभा मतदार संघ यांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिवंगत राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांना जयंती निमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात येणार आहे. स्व. अजितदादा पवार यांचे समाजहिताचे विचार, लोकाभिमुख व जनसेवेप्रती असलेली बांधिलकी याचा वारसा जपण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व फ्रंट व सेलचे पदाधिकारी जनसेवा सप्ताहामधील कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत. जनसेवा सप्ताहाच्या माध्यमातून स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे.

COMMENTS