Homeताज्या बातम्या

हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राजेंद्र गुगळे यांचे निधन

शहरातील हिरालाल चौक परिसरातील साधना मेडिकलचे संचालक तथा व्यावसायिक राजेंद्र रावसाहेब गुगळे यांचे गुरुवार, दि. 16 जुलै 2026 रोजी दुपारी 4 वाजण्याच

पक्षांतरविरोधी याचिका न्यायालयाने फेटाळलीपुराव्यांशिवाय हस्तक्षेप शक्य नाही ; सर्वोच्च न्यायालयाची भूमिका
सरकारी जागेची परस्पर मालकी नोंदवणार्‍यांना दणकाभाडेपट्टा नोंदीवर आता‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार ! ; महसूलमंत्री बावनकुळे यांचा निर्णय
दहशतवाद आणि सिंधू जल करार एकत्र शक्य नाहीसंयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत भारताने पाकिस्तानला सुनावले



शहरातील हिरालाल चौक परिसरातील साधना मेडिकलचे संचालक तथा व्यावसायिक राजेंद्र रावसाहेब गुगळे यांचे गुरुवार, दि. 16 जुलै 2026 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने व्यापारी व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
राजेंद्र गुगळे हे शांत, मनमिळाऊ आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या सौम्य स्वभावामुळे त्यांनी समाजात आपला वेगळा ठसा उमटवला होता. त्यांच्या अकाली निधनाने मित्रपरिवार, नातेवाईक तसेच सामाजिक वर्गातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी संध्या राजेंद्र गुगळे, लहान भाऊ नरेंद्र गुगळे, पुतणे अक्षय व आकाश, तसेच मुली नेहा, निशा आणि निधी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गुगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

COMMENTS