गेवराई आगाराच्या ताफ्यात 3÷2 आसन रचनेच्या पाच नवीन, अत्याधुनिक ’राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल झाल्या असून, शनिवारी आ. विजयसिंह पंडित यांच्यासह ईतर मान

गेवराई आगाराच्या ताफ्यात 3÷2 आसन रचनेच्या पाच नवीन, अत्याधुनिक ’राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल झाल्या असून, शनिवारी आ. विजयसिंह पंडित यांच्यासह ईतर मान्यवरांच्या उपस्थितीत या बसेसचे विधिवत पूजन करून प्रवाशांच्या सेवेसाठी लोकार्पण करण्यात आले.
यावेळी बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, राज्याचे परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने या नवीन बसेस गेवराई आगाराला उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे लांब पल्ल्याच्या तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार बससेवा मिळणार आहे. सध्या गेवराई आगारातून मुंबई, पुणे, कल्याण, सोलापूर, पंढरपूर आदी मार्गांवर बससेवा सुरू आहे. नव्याने दाखल झालेल्या पाच बसेसमुळे या मार्गांवरील सेवा अधिक सक्षम होणार असून, ग्रामीण भागातील अनेक मार्गांवरही नव्या बसफेर्या सुरू करण्यास मदत होणार आहे.यावेळी ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे प्रगतिपथावर असून मागील काळात रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे बंद झालेल्या बसफेर्या पुन्हा सुरू करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकार्यांना देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमामुळे गेवराई तालुक्यातील नागरिकांना अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि वेळेवर सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS