Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

पोलीस फलकाचीही सुटका नाही!; गोदावरीसमोर पोलिसांनीच ‘कायद्याची हवा’ काढलीवाहतूक कोंडीवर कारवाई की विभागांतर्गत ‘एअर स्ट्राईक’? नागरिकांत चर्चा रंगली

गोदावरी परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यावर उभ्या चारचाकी गाड्या आणि त्यातून होणारा त्रास यावर प्रसारमाध्यमांनी जोरदार प्रकाशझोत टाकल्यानंतर अखेर प

तर्कशक्ती, अध्यात्म आणि समाजप्रबोधनाचा अनोखा संगमह.भ.प. राजू महाराज लोखंडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवपद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने व अभिनेत्री मेघना झुझम यांच्या हस्ते सन्मान
अहमद इनामदार यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात  
अतिक्रमण हटाव मोहिमेत भेदभाव नको; सर्वांवर समान कारवाई करा-रतन गुजर


गोदावरी परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यावर उभ्या चारचाकी गाड्या आणि त्यातून होणारा त्रास यावर प्रसारमाध्यमांनी जोरदार प्रकाशझोत टाकल्यानंतर अखेर पोलीस यंत्रणा जागी झाली. मात्र जागी होताच त्यांनी असा काही दणका दिला की नागरिकही चक्रावले आणि वाहनधारकांनी डोक्याला हात लावला.
गोदावरी स्नॅक्स सेंटरसमोर रस्त्यावर उभ्या असलेल्या एका चारचाकी वाहनावर मोठ्या अभिमानाने झजङखउए असा फलक झळकत होता. सामान्य नागरिकांनी तो फलक पाहून गाडीला कदाचित अभयदान मिळेल, असा अंदाज बांधला होता. पण कायद्याच्या दृष्टीने सर्व समान असतात, हे सिद्ध करण्याचा विडाच जणू पोलिसांनी उचलला आणि थेट त्या गाडीचीच हवा सोडून दिली! घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी हा प्रकार पाहून ही कारवाई आहे की विभागांतर्गत शिस्तभंग? असा प्रश्न उपस्थित केला. तर काहींनी, पोलीस आता इतके निष्पक्ष झाले आहेत की स्वतःच्या गाडीचीही हवा काढतात, अशी मिश्कील प्रतिक्रिया दिली. वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त होते, हे खरे; मात्र अनेक दिवस रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांकडे दुर्लक्ष करणार्‍या यंत्रणेला अचानक आलेली ‘जाग’ पाहून परिसरात हास्यकल्लोळ उडाला. काही जणांनी तर, माध्यमांनी बातमी लावली आणि प्रशासनाने हवा काढली, असा उपरोधिक टोला लगावला. विशेष म्हणजे, संबंधित वाहनाच्या टायरमधील हवा निघाल्यानंतर काही काळ परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली. अनेकांनी मोबाईल काढून छायाचित्रे टिपली, तर काहींनी पोलीस विरुद्ध पोलीस असा नवा एपिसोड सुरू झाल्याच्या थाटात चर्चा रंगवली. दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील इतर वाहनधारकांनी आपल्या गाड्या घाईघाईने हटवण्यास सुरुवात केली. काहींनी तर गाडीवर पोलीस लिहिलं म्हणून उपयोग नाही; हवा कोणाचीही जाऊ शकते, असा अनुभव शेअर केला. वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने केलेली कारवाई निश्चितच स्वागतार्ह असली, तरी गोदावरीसमोर पोलिसांनीच पोलिसांच्या गाडीची पंक्चर ही घटना आता शहरात चांगलीच चर्चेचा आणि विनोदाचा विषय ठरली आहे.

COMMENTS