Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

पत्रकार नेते संजय भोकरे यांच्या हत्येच्या कटाचा निषेध; ‘झेड प्लस’ सुरक्षा व सूत्रधाराच्या अटकेची मागणीमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नांदेड पोलिस अधीक्षकांना निवेदन

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संस्थापक तथा ज्येष्ठ संपादक संजय भोकरे यांच्या हत्येचा कट उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील पत्रका

’मविआ’ने त्यांचा मसुदा आम्हाला दाखवावा
स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मायक्रोसॉफ्टसोबत एआय सहकार्याची मोठी घोषणा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संस्थापक तथा ज्येष्ठ संपादक संजय भोकरे यांच्या हत्येचा कट उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील पत्रकारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सांगली पोलिसांनी या कटाचा पर्दाफाश केल्यानंतर पत्रकार संघटनांनी आक्रमक भूमिका घेत संजय भोकरे यांना तात्काळ ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात यावी तसेच कटामागील मुख्य सूत्रधाराला त्वरित अटक करण्यात यावी, अशी ठाम मागणी केली आहे.
या मागणीसंदर्भात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी नांदेडचे पोलिस अधीक्षक अबिनाश  कुमार यांना निवेदन सादर केले. निवेदनात पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करत, पत्रकारांचा आवाज दडपण्याचा आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आघात करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी म्हटले आहे की, कट उघडकीस आल्यानंतरही धोका पूर्णपणे टळलेला नाही. पत्रकार नेतृत्वाला लक्ष्य करण्याचे प्रयत्न पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या प्रकरणाचा सखोल तपास करून कठोर आणि निर्णायक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर मराठवाडा विभागीय अध्यक्ष संपादक रुपेश पाडमुख, मराठवाडा उपाध्यक्ष  रामेश्वर काकडे, मराठवाडा नेते नरेश दंडवते, कार्याध्यक्ष रमेश पांडे, कोषाध्यक्ष कृष्णा पाटील जोमेगावकर, उपाध्यक्ष प्रा. अमृत जाधव, महानगराध्यक्ष रमेश देवडे, परभणीचे संघपाल अडागळे यांच्यासह अनेक पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. दरम्यान, पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, पत्रकारांचे संरक्षण धोक्यात आल्यास लोकशाहीच धोक्यात येईल. पत्रकारांवर हल्ले करणार्‍या किंवा कट रचणार्‍या प्रवृत्तींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

COMMENTS