कोपरगाव शहर : ई-फार्मसीद्वारे होणारी औषध विक्री, मोठ्या कंपन्यांचे आक्रमक किंमत धोरण तसेच केंद्र सरकारच्या जीएसआर २२० (ई) व जीएसआर ८१७ (ई) अधिसूचना मागे घेण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने बुधवार (दि. २० मे) रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. हा बंद कोपरगाव तालुक्यात यशस्वी करण्यासाठी सर्व औषध विक्रेत्यांनी एकजूट दर्शविली असून तालुक्यातील सर्व केमिस्ट या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती कोपरगाव तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तसेच ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांच्या वतीने यासंदर्भातील निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. संघटनांच्या म्हणण्यानुसार, देशभरातील सुमारे १२ लाख ४० हजार औषध विक्रेत्यांच्या विविध मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. विशेषतः ई-फार्मसीद्वारे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची पुरेशी पडताळणी न करता औषध विक्री होत असल्याने स्व-औषधोपचाराचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सर्व केमिस्ट राष्ट्रीय अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या आंदोलनात सहभागी होणार असून मंगळवार (दि. १९ मे) मध्यरात्रीपासून बुधवार (दि. २० मे) मध्यरात्रीपर्यंत बंद पाळण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.जिल्हा उपाध्यक्ष तथा कोपरगाव तालुका अध्यक्ष गणेश वाणी, उपाध्यक्ष भरत मोरे, कार्याध्यक्ष कावेरी आहेर, सचिव प्रविण गवळी, खजिनदार रूपाली पाटील, सदस्य विजय जगताप, सचिन अमृतकर, अजय शहा, मंदार पहाडे, श्रीकांत पैठणे, अपर्णा गाडेकर, ग्रामीण कार्याध्यक्ष नितीन खैरनार, सहसचिव प्रशांत बोरावके, सहखजिनदार संदीप डागा, जनसंपर्क अधिकारी रुतुल जाधव, स्वीकृत सदस्य संदीप गोळेचा व सुनील थोरात यांनी या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

COMMENTS