Homeताज्या बातम्या

आज २७ वी भव्य चालण्याची स्पर्धा; २८ जूनला रत्नेश्वरी पदयात्रा व बीजरोपण अभियान

नांदेड: शहरातील नागरिकांमध्ये आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने २७ व्या भव्य चालण्याच्या स्पर्धेचे तसेच

राज्यस्तरीय कृषी पुरस्कार सोहळा: १८९ शेतकरी आणि अधिकाऱ्यांचा होणार गौरव; कृषी दिन सोहळ्याचे आयोजन
सरसकट कर्जमाफीवर निर्णय न झाल्यास मराठवाडा पेटेल; आमदार रोहित पवार यांचा सरकारला थेट इशारा
समुपदेशनाद्वारे जिल्ह्यातील ८६ केंद्रप्रमुख पदांची नियुक्ती; प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण
Mata Ratneshwari Temple Wadepuri, Tal. Loha, Dist. Nanded - Pilgrim Data  Services

नांदेड: शहरातील नागरिकांमध्ये आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने २७ व्या भव्य चालण्याच्या स्पर्धेचे तसेच २७ व्या रत्नेश्वरी पदयात्रा व बीजरोपण अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

चालण्याच्या स्पर्धेत आकर्षक मोबाईल जिंकण्याची संधी

२७ वी भव्य चालण्याची स्पर्धा आज, बुधवार दि. २४ जून २०२६ रोजी सकाळी ६ वाजता श्री रामसेतू, गोवर्धन घाट, नांदेड येथून सुरू झाली आहे. नागरिकांमध्ये नियमित चालण्याची सवय निर्माण होऊन आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या स्पर्धेत विविध वयोगटांसाठी एकूण ११ गटांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक मोबाईल बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.

२८ जूनला रंगणार रत्नेश्वरी पदयात्रा आणि बीजरोपण

यानंतर रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ६ वाजता २७ वी रत्नेश्वरी पदयात्रा व बीजरोपण अभियान राबविण्यात येणार आहे. या पदयात्रेची सुरुवात बालाजी मंदिर, जीजी रोड, नांदेड येथून होणार आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी पदयात्रेसोबतच बीजरोपण अभियानही चालवले जाणार आहे.

या दोन्ही महत्त्वपूर्ण आणि लोकहितकारी कार्यक्रमांमध्ये युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर (भाजपा महानगर सरचिटणीस तथा महानगर योग दिन संयोजक) यांनी केले आहे.

COMMENTS