Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

पेपरफुटीमुळे ‘नीट’ परीक्षा रद्दनांदेडमधील हजारो विद्यार्थ्यांना मोठा धक्काअभ्यास करूनही आमचा काय दोष? विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल

नीट (यूजी) 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांनंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (छढ-) अखेर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या

वीजबिलाच्या ‘नावात बदल’ आता घरबसल्या ; महावितरण मोबाईल ॲप व संकेतस्थळावर ऑनलाईन सेवा उपलब्ध
पुणे शहराच्या सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी जलसंपदा विभाग प्रयत्नशील  : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील
NEET परीक्षेच्या धक्क्यातून विद्यार्थिनीची आत्महत्या; लातूरमधील दुर्दैवी घटना



नीट (यूजी) 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांनंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (छढ-) अखेर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नांदेड जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा मानसिक धक्का बसला असून विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राष्ट्रीय परीक्षा संस्थेमार्फत रविवारी देशभरात नीट (यूजी) प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. नांदेड जिल्ह्यात शहर व ग्रामीण भागातील एकूण 46 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. जिल्ह्यातील तब्बल 25 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली होती. परीक्षेदरम्यान कडक नियमावली, तपासणी आणि देखरेखीची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र परीक्षा संपल्यानंतर काही तासांतच प्रश्नपत्रिका फुटल्याच्या तक्रारी समोर आल्या. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा संस्थेने तातडीची बैठक घेऊन परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. संस्थेकडून लवकरच फेरपरीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात येणार असून विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढला असून पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. महिनोन्महिने अभ्यास करूनही आमचा काय दोष? असा संतप्त सवाल विद्यार्थी आणि पालकांकडून उपस्थित केला जात आहे. अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी मोठ्या मेहनतीने तयारी केली होती. मात्र पेपरफुटीच्या प्रकारामुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरल्याची भावना व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर आणि सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

COMMENTS