Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्री भुजबळांचे हेलिकॉप्टर उतरवले वाहनतळावर;हेलिपॅडवर न उतरवल्याने संताप ; कोणतीही जीवितहानी नाही

पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे हेलिकॉप्टर उतरणीदरम्यान घडलेल्या गंभीर त्रुटीमुळे मोठा अनर्थ टळल्याची घटना समोर आली आहे. म

खा.सुप्रिया सुळेंनी टोचले पार्थ पवारांचे कान; राष्ट्रवादी पार्थच्या बचावासाठी मैदानात; खा. राहुल गांधींच्या कामगिरीवर प्रश्‍नचिन्ह
‘समर्थ क्रॉप केअर’कडून कोट्यवधींची फसवणूक; वाढीव व्याजाचे आमिष; एजंट-गुंतवणूकदार हाणामारीनंतर प्रकार समोर
पुण्यात पोलिस भरतीत धावतांना तरूणाचा मृत्यू

पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे हेलिकॉप्टर उतरणीदरम्यान घडलेल्या गंभीर त्रुटीमुळे मोठा अनर्थ टळल्याची घटना समोर आली आहे. महात्मा फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ येथे येत असताना ही घटना घडली. कार्यक्रमासाठी स्वतंत्रपणे हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आलेली होती. मात्र, संबंधित वैमानिकाने नियोजित ठिकाणी न उतरता हेलिकॉप्टर थेट वाहनतळाच्या जागेत उतरवले. वाहनतळातील मोकळ्या जागेला हेलिपॅड समजल्याने ही चूक झाल्याचे प्राथमिक पाहणीत समोर आले आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे उपस्थित नागरिकांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेदरम्यान वाहनतळात काही वाहने उभी होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नाही. पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणत वैमानिकाला योग्य मार्गदर्शन केले आणि हेलिकॉप्टर सुरक्षितरीत्या दुसर्‍या ठिकाणी हलवण्यात आले. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्व नियोजन असूनही चुकीच्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवणे अत्यंत धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः लोकवस्तीच्या जवळ अशी चूक मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकली असती, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हेलिपॅड स्पष्टपणे दर्शविले होते का, वैमानिकाकडून नेमकी चूक कशी झाली किंवा काही तांत्रिक अडचण होती का, याचा तपास केला जाणार आहे. घटनेनंतर मंत्री छगन भुजबळ सुरक्षित असून त्यांनी नियोजित कार्यक्रम पूर्ण केला. मात्र, या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणा आणि समन्वयाबाबत गंभीर प्रश्‍न उपस्थित झाले असून भविष्यात अधिक दक्षता घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

COMMENTS